कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तरुणांना विळखा, 30 वर्षांखालील इतक्या जणांना लागण

 दुसऱ्या लाटेत 47 टक्के तरुणांना श्वसनाचा त्रास

Updated: Apr 20, 2021, 10:51 AM IST
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तरुणांना विळखा, 30 वर्षांखालील इतक्या जणांना लागण title=

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second wave of covid-19) तरुणांना विळखा बसलेला पहायला मिळतोय. 30 वर्षांखालील 32% जणांना कोरोनाची लागण झालीय. दुसऱ्या लाटेत बाधित तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे. दुसऱ्या लाटेत 47 टक्के तरुणांना श्वसनाचा त्रास होतोय.  

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव तरुणांवरही दिसून येत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत सध्या तरुण कोरोना बाधित रुग्णांची संख्या समान आहे. मात्र एप्रिलमध्ये आढळलेल्या तरुण रुग्णांची प्रकृती अधिक चिंताजनक आहे. अनेकांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे. तर निम्म्याहून अधिक तरुण रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवावं लागतंय. IDSP कडून करण्यात आलेल्या सर्व्हेनंतर ही आकडेवारी समोर आली आहे. यानुसार दुसऱ्या लाटेत आढळलेले 32 टक्के रुग्ण 30 वर्षाखालील आहे. 

कोरोनाच्या या दुसर्‍या लाटेत (Second wave of covid-19)कोरोनाचा नवी विषाणू  B.1.1.7 आणि B.1.617चे नवीन प्रकार मुलांसाठी अधिक धोकादायक आहे, हे पुढे आले आहे.  (More dangerous for kids) आणि या दुसर्‍या लाटेमध्ये मोठ्या संख्येने मुलांना (Coronavirus in kids) कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून येते. यामुळे मुलांचेत पालक चिंतेत आहेत. दरम्यान, मुलांना जर खालील लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करु नका.

या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका

नवी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सुभाष राव सांगतात, "कोरोनाची दुसरी लाटेत पूर्णपणे उलट ट्रेंड Reverse trend) दिसून येत आहे.  गेल्यावर्षी, लहान मुलांना कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. त्याचवेळी, यावर्षी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत, प्रथम लक्षणे मुलांमध्ये दिसून येत आहेत आणि संसर्ग लहान मुलांपासून प्रौढांपर्यंत पसरत आहे. म्हणूनच जर आपल्याला ही लक्षणे मुलांमध्ये दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

-ताप
- सर्दी पडसे
- कोरडा खोकला
- लूज मोशन (जुलाब)
-उल्टी येणे
- भूक न लागणे
- जेवण योग्य प्रमाणात न घेणे
- थकवा जाणवणे
-शरीरावर पुरळ उठणे
- श्वास घेताना अडचण किंवा त्रास होणे

लहान मुलं सुपरप्रेडर असू शकतात
डॉ. राव सांगतात लहान मुलाला कोविड-19 इंफेक्शन अर्थात संसर्गाची लक्षणे (Symptoms of covid-19) दिसल्यास दुसर्‍या दिवशी लगेचच आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्या. चाचणी करुन घेण्यात उशीर करु नका. उपचार लवकर सुरु करणे महत्वाचे आहे. हे लक्षात ठेवा की मुले सुपरप्रेडर होऊ शकतात, म्हणजेच ते इतर मुलांना आणि प्रौढांना वेगाने संक्रमित करु शकतात. त्यामुळे पालकांनी योग्य ती काळजी घ्यावी.