मुंबई : भारतीय स्टेट बँकेने सांगितलं आहे की, यावर्षी १४ हजार नियुक्तीची मोठी योजना आखणार आहे. SBI ने सांगितल्याप्रमाणे आपला व्यवहार अधिक विस्तारीत करण्यासाठी त्यांना आणखी काही लोकांची आवश्यकता आहे. तसेच बँकेने असे देखील स्पष्टीकरण दिलं आहे की, वीआरएस स्कीम कॉस्ट कटिंगकरता नाही आहे. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही.
देशातील सर्वात मोठी बँक म्हणून एसबीआयकडे पाहिलं जातं. स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना म्हणजे VRS बँकेतील उपस्थिती कमी करण्यासाठी नाही आहे. आधीच्या माहितीनुसार, बँकेने कर्मचाऱ्यांकरता VRS ची योजना आणली आहे. यामध्ये जवळपास ३०,१९० कर्मचारी येऊ शकतात. या दरम्यान पीटीआयला बँकेच्या प्रवक्तांनी सांगितल्यानुसार, बँकेचा विस्तार वाढवण्यासाठी ही VRS योजना नाही.
बँकेद्वारे जाहिर करण्यात आलं की, 'बँक कायम कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्वक वागते. बँक आपला व्यवहार वाढवत आहे. ज्याकरता आणखी काही लोकांची आवश्यकता आहे. यावरून हे स्पष्ट होतं की, बँकेला १४,००० पदांकरता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे.'
त्यांनी म्हटल्यानुसार, स्टेट बँकेत सध्या जवळपास अडीच लाख कर्मचारी आहे. बँक आपल्या कर्मचाऱ्यांच्या गरजा जाणून त्या पूर्ण करू इच्छिते.
There've been reports about 'On Tap VRS' scheme proposed to be introduced by SBI. It's been interpreted as cost-cutting measure. SBI is employee-friendly & expanding its operations evidenced by the fact that Bank has plans of recruiting over 14,000 employees this year: SBI Spox pic.twitter.com/0Q01YnkEon
— ANI (@ANI) September 7, 2020
या अगोदर अशी माहिती समोर आली होती की, भारतीय स्टेट बँक आपल्या कर्मचाऱ्यांकरता नवीन VRS2020 अशी योजना आणली होती. यामध्ये जवळपास ३०१९० कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ही योजना त्या कर्मचाऱ्यांसाठी होती. ज्यांनी बँकेला आतापर्यंत आपल्या कामाची २५ वर्षे दिली आहेत आणि ज्यांच वय ५५ वर्षे असेल. ही योजना १ डिसेंबर ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत असणार आहे.
जे कर्मचारी ही वीआरएस स्विकारणार आहेत. त्यांना वास्तविक रिटायरमेंट तारखेपर्यंतच्या कालावधीकरता वेतनाच्या ५० टक्के एक्स ग्रेशियाच्या रुपात दिले जाणार आहे. याचप्रमाणे ग्रॅज्युटी, पेंशन, भविष्य निधी आणि मेडिकल बेनिफिट्सचा देखील फायदा होणार आहे.