LAC वर पँगाँगमध्ये भारतीय सेनेचा पराक्रम, चीनला सडेतोड उत्तर

चीनचा पलटवार... भारतीय सैनिकांनी LAC पार केल्याचा आरोप

Updated: Sep 8, 2020, 08:02 AM IST
LAC वर पँगाँगमध्ये भारतीय सेनेचा पराक्रम, चीनला सडेतोड उत्तर  title=

मुंबई : सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या पूर्वी लडाखमध्ये पुन्हा एकदा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, भारतीय सेनेने या घुसघोरांना सडेतोड उत्तर दिलं. पँगाँगच्या नदी पात्राच्या दक्षिणी भागात शेनपाओ डोंगराळ भागात ही घटना घडली. पँगाँग नदी पात्राच्या दक्षिणी किनाऱ्यावर चीनने घुसघोरीचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा मनसुबा भारतीय सैनिकांनी हानून पाडला. भारतीय सैनिकांनी वॉर्निंग फायरिंग करून चीनच्या सैनिकांना तिथेच रोखलं. 

चीनने आता उल्टा आरोप भारतावर लावला आहे की, त्यांनी चीनला उकसवलं आहे. चीनने भारतीय सेनेवर LAC पार करण्याचा आरोप केला आहे. चीनचा असा आरोप आहे की, भारतीय सेनेने LAC वर चीन सैनिकांनी उकसावण्याचा प्रयत्न केला आणि चीन सैनिकांवर गोळीबार देखील केला.

लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC) वर पूर्वी लडाख परिसरात चीनी सेनाने फायरिंग केलं. सोमवारी रात्री हा गोळीबार भारतीय चौकीच्या दिशेने करण्यात आला होता. याला प्रत्युत्तर देताना भारतीय सेनेने फायरींग करून चीनला समज दिली.