SBI ची ग्राहकांसाठी खुशखबर! व्याजदरात कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ०.३५ टक्क्यांनी कमी केला आहे. यानंतर SBI ने MCLR आधारित लोनवरील व्याजदर कमी केला आहे. ०.१५ टक्के व्याजदर स्टेट बँकेने कमी केला आहे. नवीन व्याजदर १० ऑगस्टपासून लागू होणार आहे.

Updated: Aug 7, 2019, 05:37 PM IST
SBI ची ग्राहकांसाठी खुशखबर! व्याजदरात कपात title=

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट ०.३५ टक्क्यांनी कमी केला आहे. यानंतर SBI ने MCLR आधारित लोनवरील व्याजदर कमी केला आहे. ०.१५ टक्के व्याजदर स्टेट बँकेने कमी केला आहे. नवीन व्याजदर १० ऑगस्टपासून लागू होणार आहे.

SBI ने व्याजदर कमी केल्यानंतर एका वर्षात MCLR आधारित लोनवर व्याजदर ८.२५ टक्के झाला आहे. याआधी हा व्याजदर ८.४० टक्के होता. १ जुलैपासून SBI ने होम लोन सरळ रेपो रेट सोबत जोडला आहे. म्हणजेच रेपो रेट कमी होताच होम लोनवरील व्याजदर देखील कमी होणार आहे. स्टेट बँकेने मार्चमध्ये घोषणा केली होती की १ मेपासून बचत खाते आणि कमी काळासाठी घेतलेल्या लोन देखील रिझर्व्ह बँकच्या रेपो रेट सोबत जोडला जाईल.

जुलैमध्ये SBI ने MCLR मध्ये देखील व्याजदर कमी केले होते. ज्यामुळे होम लोन, कार लोन आणि इतर लोन देखील स्वस्त झाले होते.  बँकेने सगळे टेनर्स लोनवरील व्याजदर कमी केले होते. त्यानंतर एक वर्षासाठीच्या कर्जावर ८.४५ टक्के ऐवजी ८.४० टक्के व्याजदर आकारण्यात आला होता.

रिझर्व्ह बँकेने आज रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट ०.३५ टक्क्यांनी कमी केलं आहे. रेपो रेट ५.७५ टक्क्यांनी कमी होऊन ५.४० टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ५.५० वरुन ५.१३ टक्के झाला आहे.