SBI Loan Without Guarantee : दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या (Social Media) वाढत्या वापरकर्त्यांमध्ये अनेक वेळा चुकीच्या बातम्या व्हायरल (Viral) होतात. त्यामुळे अनेकवेळा लोक फसवणुकीला बळी पडतात. त्यामुळे कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी किंवा फॉर्म भरण्यापूर्वी त्याची योग्य माहिती घेणे महत्त्वाचे आहे. आजकाल अनेक यूट्यूब चॅनलवर (Youtube Channel) सरकारच्या योजनांबाबत दावे केले जात आहेत.
दर महिन्याला मुलींना मिळत आहेत 2500 रुपये!
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री कन्या सन्मान योजने’ (PM Kanya Samman Yojana) अंतर्गत मुलींना दर महिन्याला 2500 रुपये दिले जात असल्याचा दावा अनेक यूट्यूब चॅनल्सद्वारे केला जात आहे. हे पैसे थेट मुलीच्या बँक (bank) खात्यात पोहोचत आहेत. याशिवाय युट्यूब चॅनलवर (Youtube channel) असाही दावा केला जात आहे की, 'महिला स्वरोजगार योजने' (Mahila Swarojgar Yojana 2022) अंतर्गत सरकार सर्व महिलांच्या खात्यात एक लाख रुपये ट्रान्सफर (money transfer) करत आहे. याद्वारे महिला आपला व्यवसाय करू शकतात.
25 लाखांचे कर्ज हमीशिवाय आणि व्याजाशिवाय!
सरकारच्या 'नारी शक्ती योजने' (Nari Shakti Yojana) अंतर्गत, SBI देशातील सर्व महिलांना हमीशिवाय आणि व्याजाशिवाय 25 लाख रुपयांचे कर्ज देत आहे. या व्हायरल मेसेज (msg viral) आणि यूट्यूब चॅनलवर असा दावाही केला जात आहे की ही योजना संपूर्ण भारतातील महिलांसाठी आहे.
PIB कडून स्पष्टीकरण
पीआयबीने (PIB Fact Check) अशा सर्व योजनांना बनावट म्हटले आहे. पीआयबीने केलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, काही यूट्यूब चॅनलवर विविध सरकारी योजनांशी संबंधित माहिती दिली जात आहे, जी प्रत्यक्षात नाही. फसवणूक करणाऱ्यांनी चुकीच्या भावनेने तयार केलेल्या अशा साहित्याला बळी पडू नका.
या व्हिडिओंमध्ये नमूद केलेल्या वेबसाइटवर तुमची वैयक्तिक माहिती कधीही शेअर करू नका. असेही पीआयबीकडून सांगण्यात आले. सायबर गुन्ह्यांमध्ये सामील असलेले लोक तुमच्या वैयक्तिक तपशीलाचा वापर करू शकतात.
Some YouTube channels provide details related to various government schemes, which do not exist in actuality.
Beware! Don't fall for content curated by fraudsters with malicious intent.
Follow these simple steps to counter such content. #PIBFacTree pic.twitter.com/VWB0PIf2B8
— PIB Fact Check (@PIBFactCheck) September 2, 2022