SBI चा कर्जधारकांना दणका; स्वस्त कर्जाच्या अपेक्षा ठेवणाऱ्यांचा हिरमोड

SBI EMI Lending Rate: स्टेट बँकेच्या कर्जधारकांपैकी तुम्हीही एक आहात का? बँकेनं केले आहेत मोठे बदल, जाणून घ्या तुमच्या खर्चाचं गणित नेमकं किती फरकानं बदलणार  

सायली पाटील | Updated: Jun 15, 2024, 09:45 AM IST
SBI चा कर्जधारकांना दणका; स्वस्त कर्जाच्या अपेक्षा ठेवणाऱ्यांचा हिरमोड  title=
sbi emi rates will increase as bank hikes lending rate by 10 basis point latest update

SBI EMI Lending Rate: देशातील सर्वात मोठी सरकारी आणि अनेक खातेधारकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसबीआयकडून नुकतीच एक अपडेट जारी करण्यात आली आहे. एसबीाआयच्या या अपडेटमुळं कर्जधारकांना धक्का बसला आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

उपलब्ध माहितीनुसार एसबीआयकडून एमसीएलआर (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉईंटनं म्हणजेच 0.1 टक्के दरानं वाढ केली आहे. ज्यामुळं आता एसबीआयकडून कर्ज घेतलेल्या अनेकांनाच वाढीव आर्थिक मारा सोसावा लागणार आहे. ज्या कर्जधारकांनी एमसीएलआरवर आधारित कर्ज घेतलं आहे, त्यांना या निर्णयामुळं सर्वाधिक फटका बसणार असून, इतर निकषांवर आधारिक कर्जधारकांवर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. 

हेसुद्धा वाचा : Video : पंतप्रधान मोदींना पाहताच जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून हात जोडून नमस्कार, मनापासून स्वागत... भेटीची एकच चर्चा 

 

15 जूनपासून नवे दर लागू 

SBI च्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार नवे एमलीएलआर दर, 15 जूनपासून लागू होणार असून, या बदलांपूर्वी असणारे व्याजदर 8.65 वरून आता 8.75 टक्क्यांवर पोहोचले आहेत. ओवरनाईट एमसीएलआर आता 8 टक्क्यांवरून 8.10 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, एक आणि तीन महिन्यांसाठीचा एमसीएलआर इथून पुढं 8.20 टक्क्यांवरून 8.30 टक्क्यांवर पोहोचला आहे. सहा महिन्यांच्या एमसीएलआरचे दर 8.55 टक्क्यांवरून 8.65 टक्क्यांवर पोहोचले आहेत. 

दोन वर्षांचा एमसीएलआर 0.1 टक्क्यांनी वाढून 8.85 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर, 3 वर्षांचा एमसीएलआर 8.85 टक्क्यांवरून 8.95 टक्क्यांवर पोहोचला आहे.