व्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला

शनिवारी एकीकडे सलमानला जामीन मिळाला तर बलात्काराचा आरोपी असलेल्या आसारामविरुद्ध अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता २५ एप्रिल रोजी निर्णय सुनावला जाईल. 

Shubhangi Palve Updated: Apr 7, 2018, 08:25 PM IST
व्हिडिओ : आसारामनं सलमानला दिला मोलाचा सल्ला  title=

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात दोन रात्री घालवाव्या लागल्या. त्याला तुरुंगात आणखीन एक आरोपी आसाराम याच्या शेजारच्या बरॅकमध्ये ठेवण्यात आलं होतं. ५० तास तुरुंगात राहिल्यानंतर सलमानला जामीन मिळाला आणि तो तुरुंगातून सुटून मुंबईकडे रवाना झाला. 

शनिवारी एकीकडे सलमानला जामीन मिळाला तर बलात्काराचा आरोपी असलेल्या आसारामविरुद्ध अंतिम युक्तीवाद पूर्ण झाला. यावर आता २५ एप्रिल रोजी निर्णय सुनावला जाईल. 

सलमानला मोलाचा सल्ला 

प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान कोर्टात दाखल झालेल्या आसारामशी जेव्हा मीडियानं बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा साहजिकच त्याला सलमानबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. सलमान तुरुंगाबाहेर गेला, चांगलंच झालं असं यावेळी आसारामनं म्हटलं. 

सलमान तुझ्यासोबत राहिला का? सलमानला दीक्षा दिली का? या प्रश्नांवर उत्तर देताना आसारामनं म्हटलं, 'मी आता सलमानला समजावलंय. आता सलमान सिगारेट पिणं सोडून देणार आहे आणि पिणंही कमी करणार आहे'

यापूर्वी, बरॅकमध्ये सलमानला भेटण्यासाठी लोकं येत होती. तो ऑटोग्राफ देत होता. हे सगळं पाहून जवळच असले आसाराम बापू यांना ते पटलं नाही. त्यांनी म्हटलं की 'मला भेटण्यासाठी तर कधी नाही आले पण हा सेलिब्रिटी आहे म्हणून भेटण्यासाठी आले.'

व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

सलमानला स्पेशल ट्रिटमेंट

काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेला अभिनेता सलमान खान २ दिवस तुरुंगात होता. जेलमध्ये सलमानला खास ट्रिटमेंट मिळत असल्याचं समोर आलं आहे. सलमानने जेलमध्ये कैदांचा ड्रेसही नाही घातला आणि जेवण ही नाही केलं. गुरुवारी सलमानसाठी जेलमध्ये रात्र काढणं कठीण झालं होतं. मच्छरांमुळे सलमानला झोप नाही लागली. ओडोमस लावल्यानंतर तो झोपला तर सकाळी १० ला तो उठला. 'न्यूज२४'ने दिलेल्या बातमीनुसार, शुक्रवारी सकाळी त्याला जेलमध्ये चने आणि चहा विचारली गेली. पण त्याने ती घेतली नाही. त्यानंतर त्याने बाहेरुन कॉफी आणि जेवन मागवलं.