नवी दिल्ली : डोकलामच्या मुद्यावरून रशियानं तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारलीय... यासोबतच भारताला बदनामी करण्याचा चीनी नीतिचा डाव नाकारलाय.
या मुद्यावरून ब्रिक्स संमेलनातील पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिकाही प्रभावित झाली असती. चीनच्या जियामेन शहरात रविवारी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचे नेते संमेलनात सहभागी होणार आहेत.
रशियाचे राजदूत एन्द्रे जिनिसोव यांच्या वक्तव्यावरून डोकलाम वादावर रशियाची भूमिका स्पष्ट होतेय. 'भारत - चीन सीमेवर जी परिस्थिती उद्भवलीय त्यामुळे आम्ही सर्वच दु:खी आहोत... आम्हाला वाटतं की आमचे चीनी आणि भारतीय मित्र स्वत:च या समस्येवर उपाय काढू शकतील... त्यांच्यात मध्यस्थाची गरज आम्हाला तरी वाटत नाही' असं म्हणत त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका स्वीकारली होती.
डोकलाम वाद क्षमवण्यासाठी २८ ऑगस्ट रोजी सैनिकांना परत बोलवण्याच्या भारत-चीनच्या कराराच्या घोषणेपूर्वीच हे वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरून भारताविरुद्ध आखलेली चीनी कुटनीतीचा रशियावरही परिणाम झाला नसल्याचंच दिसतंय. महत्त्वाचं म्हणजे, इतर पश्चिमी देशांच्या तुलनेत रशिया हा चीनचा जवळचा मित्र देश मानला जातो.