नवी दिल्ली : पवित्र कुराणमध्ये उल्लेख करण्यात आलेलं 'रेहान'चं झाड म्हणजेच 'तुळस' असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं म्हणणं आहे. यामुळे, 'जन्नत'चं झाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'रेहान'ची हकिगत मुस्लिम समाजासमोर मांडण्याचं एक अभियानच आरएसएसनं हाती घेतलंय.
संघाकडून एक अभियान चालवून मुस्लिमांना तुळशीच्या झाडाचं महत्त्व पटवून दिलं जाणार आहे. शिवाय प्रत्येक घरात तुळशीचं झाड लावण्यासाठी या अभियानाद्वारे प्रयत्न करण्यात येणार आहे. संघाचे ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी एका हिंदी वर्तमानपत्राशी बोलताना ही माहिती दिलीय.
देशभरात सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यात हे अभियान चालवण्यात येणार आहे. सर्व मुस्लिमांच्या घरात 'जन्नत का पौधा' म्हणजेच 'तुळस' असायला हवी... रेहान हा अरबी भाषा शब्द आहे ज्याला इंग्रजीत बैजल आणि हिंदीत तुळस म्हटलं जातं, असं इंद्रेश कुमार यांनी म्हटलंय.