RPI सीमा हैदरला तिकीट देणार? रामदास आठवलेंचं मोठं विधान, म्हणाले 'हो, आम्ही देणार, पण...'

Ramdas Athawale on Seema Haider: आपला प्रियकर सचिनसाठी (Sachin) सीमा ओलांडून भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरला (Seema Haider) 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' लोकसभेचं तिकीट देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच आता रामदास आठवले (Ramdas Athavale) यांना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 4, 2023, 12:48 PM IST
RPI सीमा हैदरला तिकीट देणार? रामदास आठवलेंचं मोठं विधान, म्हणाले 'हो, आम्ही देणार, पण...' title=

Ramdas Athavale on Seema Haider: आपला प्रियकर सचिनसाठी (Sachin) सीमा ओलांडून भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरला (Seema Haider) 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' लोकसभेचं तिकीट देणार असल्याची चर्चा रंगली आहे. पण खरंच आरपीआय सीमा हैदरला निडणुकीसाठी तिकीट देणार आहे का? यासंबंधी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पक्षाचा नेमका काय विचार आहे हे सांगितलं आहे. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मासूम किशोर यांनी सांगितलं होतं की,  "सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणांनी सीमाला क्लिन चीट दिल्यास आणि तिला भारतीय नागरिकता मिळाल्यास तिचं पक्षात स्वागत आहे". भारताचा नागरिक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलं. 

सीमा हैदरनंतर आणखी एक तरुणी सीमा ओलांडणार, भारतीय तरुणाशी थाटामाटात केलं लग्न, फोटोंची चर्चा

 

सीमाच्या आतापर्यंतच्या तपासात तिच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. सुरक्षा यंत्रणांची क्लीन चिट मिळाल्यास सीमाला प्रवक्तेपद देण्यात येईल, कारण ती एक चांगली वक्ता आहे, असंही मासूम किशोर यांनी म्हटलं होतं. पण रामदास आठवलेंनी तिकीट देणार नसल्याचं स्पष्ट केल असून, मासूम किशोर यांनी आपल्याला न विचारता विधान केल्याची माहिती दिली आहे.

रामदास आठवलेंनी स्पष्ट केली भूमिका

रामदास आठवले यांनी सीमा हैदरला पक्षाचं तिकीट देण्याचा प्रश्नच नाही असं सांगत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सीमा हैदरला तिकीट देऊ, पण ते पाकिस्तानला जाण्याचं असंही ते म्हणाले आहेत. ते म्हणालेत "सीमा हैदरशी आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली आहे. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून सचिनशी ओळख झाल्यानंतर ती आपल्या मुलांना घेऊन पोहोचली आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत तपास करत आहेत. मासूम किशोर यांनी मला कोणतीही माहिती न देता विधान केलं आहे. सीमा हैदरला पक्षात घेण्याचा प्रश्नच नाही. जर तिला तिकीट द्यायचं असेल तर पाकिस्तानला जाण्याचं देऊ. पण तिला पक्षाचं तिकीट देणार नाही".

सीमा हैदर बॉलिवूड चित्रपटात झळकणार?

प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात दाखल झालेल्या सीमा हैदरची एका प्रोडक्शन हाऊसने नुकतीच भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी तिचं ऑडिशनही घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे जानी फारयफॉक्सच्या टीमने बुधवारी सीमाची भेट घेतली. यावेळी त्यांनी आगामी चित्रपट 'अ टेलर मर्डर स्टोरी' चित्रपटासाठी तिचं ऑडिशन घेतलं. या चित्रपटात सीमा रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट राजस्थानच्या उदयपूर येथील कन्हैयालाल या टेलरच्या हत्येवर आधारित असणार आहे. कन्हैय्यालाल यांची त्यांच्याच दुकानात अतिरेक्यांनी निर्घृणपणे हत्या केली होती. दरम्यान, चित्रपटात काम करण्याआधी सीमा हैदर आणि प्रोडक्शन हाऊस एटीएसच्या अहवालाची वाट पाहत आहेत.