इंफोसिसचे सह-संस्थापक नारायमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्याने वाद पेटला असून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी भारतातील तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम केलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत. नारायणमूर्तींच्या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चासत्रच सुरु झालं आहे. काहींनी त्यांना विरोध केला आहे, तर काहींनी समर्थन केलं आहे. यादरम्यान आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांनीही आपलं मत मांडलं आहे.
हर्ष गोयंका यांनी एक पोस्ट शेअर केली असून नारायणमूर्ती यांच्या अगदी उलट भूमिका मांडली आहे. 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा आता संपला आहे. लोक त्यांच्या कार्यालयीन वेळेच्या जवळपास 33 टक्के काम शक्य त्या ठिकाणाहून करत आहे आणि हे गेमचेंजर आहे. लोकांसाठी ही लवचिकता 8 टक्के पगारवाढ मिळण्यासारखंच आहे. ही लवचिकता समजून घेणं आणि रोजचा प्रवास टाळणं याला आम्ही जास्त महत्त्व देत आहोत असं हर्ष गोयंका यांनी सांगितलं आहे.
तसंच पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "हायब्रीड वर्क हेच देशाचं वर्तमान आणि भविष्य असेल. तसंच 5 दिवसांच्या ऑफिसचा ट्रेंडही वेळेसह पूर्णपणे संपून जाईल".
"हायब्रीड वर्क देशाचं वर्तमान आणि भविष्य आहे. 50 ते 70 काम करणं आता तुमच्या महत्वाकांक्षा आणि उद्देशांसाठीच असेल. बदल स्वीकार करा, कामाच्या नव्या पद्धतीचा अवलंब करा. ऑफिस आणि घराच्या मधील योग्य जागा शोधा. तुमच्या आयुष्यात जास्त महत्त्वाचं काय आहे त्याला प्राथमिकता देण्याची ही वेळ आहे," असं हर्ष गोयंका म्हणाले आहेत.
The 5-day office week is dead! People are working nearly 33% of their office time remotely, and it's a game-changer. Flexibility is worth as much to people as an 8% raise. What we value most is skipping the daily commute and the sense of flexibility
Hybrid work…— Harsh Goenka (@hvgoenka) October 30, 2023
"देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान 12 तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे 70 तास. तेव्हाच भारत अशा अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करु शकेल, ज्या गेल्या दोन ते दशकांपासून प्रचंड यशस्वी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील नागरिकांनी हेच केलं होतं," असं नारायणमूर्ती म्हणाले आहेत. त्यांनी पॉडकास्ट 'द रेकॉर्ड' साठी इंफोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्यांशी संवाद साधताना हा सल्ला दिला.