पती पत्नीच नातं हे विश्वासावर असतं त्यात एकानेही विश्वासघात केला तर संपूर्ण आयुष्य उद्धवस्त होते. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये नवरा मुंबईला खाजगी कंपनीत नोकरीला असताना गावी पत्नीचं विवाहबाह्य संबंध होते. या धक्कादायक खुलासानंतर हत्येचं प्रकरण समोर आलंय. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील करारी पोलीस ठाण्या हद्दीतील बडा अडहरा गावातील विवाहबाह्य संबंधातून हत्येची घटना घडलीय. (returning home from Mumbai husband caught wife with her boyfriend red handed extra marital affair crime news trending)
या गावातील महेश यांनी पोलीस स्टेशनमध्ये आपला 19 वर्षांचा मुलगा बेपत्ता आहे, अशी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. महेश यांच्या तक्रारीनुसार विजय हा 16 जूनला रात्री 8 वाजता शौचासाठी घराबाहेर गेला होता. त्यानंतर तो अद्याप घरी परतला नाही. पोलिसांनी विजयला शोधण्यासाठी मोहीम हातात घेतली आणि गावातील त्याच्या घराच्या आजूबाजूला असलेल्या घरामधील लोकांची चौकशी केली. तर या चौकशी दरम्यान असं समोर आलं की, विजयचं शेजारी राहणाऱ्या विवाहित महिलेसोबत प्रेम प्रकरण होतं. रणजीत कुमार हा मुंबईत कामासाठी राहायचा. त्याची पत्नी आणि तीन मुलं गावात राहायची.
या चौकशी दरम्यान असं समोर आलं की, रणजीतच्या अनुपस्थितीत रात्रीच्या वेळी या महिलेच्या घरी यायचा. एकदा मुंबईत असलेल्या रणजीतला गावातून अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि त्याने पत्नीच्या कारनामा सांगितला. रणजीत फोन आल्यानंतर कोणाला न सांगता मुंबईहून गाव गाठलं. त्यावेळी त्याची पत्नी विजयसोबत नको त्या अवस्थेत सापडली. हे पाहून त्याच्या तळमस्तकातील आग डोक्यात गेली. त्याने विजयला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर रागाच्या भरात त्याने विजयचा गळा आवळला. ज्यामध्ये विजयचा मृत्यू झाला.
आता आपल्या हातून गुन्हा घडल्यानंतर त्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी विजयचा मृतदेह गोणीत बांधला आणि स्कूटरवर प्रयागराजच्या नवाबगंज भागात विल्हेवाटी लावला. त्यानंतर तो मुंबईला पळून गेला. पोलिसांनी रणजीतच्या पत्नीची कसून चौकशी केल्यानंतर ही संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी रणजीतला गावाकडे बोलवलं आणि त्याला अटक केली.
सीओ सिटी सतेंद्र तिवारी यांनी सांगितलं की, मृत विजयचे वडील महेश यांनी 19 जूनला करारी पोलीस ठाण्यात मुलगा विजय कुमार बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्या पोलिसांनी तक्रारीवरून हरवल्याची नोंद करत तपास सुरू केला. या चौकशीदरम्यान विजयचे रणजीत कुमार याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्याची हत्या झाल्याच उघड झालं. आरोपीच्या सांगण्यावरून मृतदेह प्रयागराजच्या नवाबगंज भागातून ताब्यात घेण्यात आले.