पुन्हा तेच? 2000 च्या Currency Notes नंतर आता 100, 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी

2000 Rupees Note: देशात काही वर्षांपूर्वी झालेल्या नोटबंदीनंतर परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली. किंबहुना अनेकजणांना या नोटबंदीला सामोरं जाताना बऱ्याचा अडचणींचा सामना करताना दिसले. पण, हा काळही लोटला.   

Updated: May 20, 2023, 08:27 AM IST
पुन्हा तेच? 2000 च्या Currency Notes नंतर आता 100, 200, 500 रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाची बातमी  title=
Reserve Bank of India 2000 rupee note out of circulation latest update on other Currency Notes

2000 Rupees Note: शुक्रवारी केंद्र शासनानं अतिशय महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली आणि सारा देश काही क्षणांसाठी थांबला. 2000 रुपयांची नोट सक्रीय चलनातून हटवण्याची घोषणा केंद्र पातळीवर करण्यात आली आणि त्यामुळं पुन्हा एकदा देशात काही वर्षांपूर्वी लागू झालेली तशी नोटबंदी परतते काय या प्रश्नानं अनेकांना चिंतेत टाकलं. तूर्तास 2 हजार रुपयांची नोट चलनातून बाद होणार असून, 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बँकांमध्ये जमा करण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. आरबीआय आणि केंद्राच्या अख्त्यारितून आलेली ही बातमी पचत नाही तोच. आता 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांबाबत मोठी माहिती समोर येत आहे. 

गेल्या काही काळापासून चलनं आणि इतर धोरणांविषयी बऱ्याच चर्चा आणि वृत्त पाहायला मिळाली आहेत. त्यातच आता आणखी एक माहितीही समोर आलिये, जिथं पीएनबी या सरकारी बँकेकडून एक Offer देण्यात येत असल्याचं म्हटलं जातं आहे. घाबरण्याचं कारण नाही, कारण इथं पुन्हा नोटबंदी किंवा तत्सम निर्णय घेण्यात येणार नाहीये, तर या निर्णयामुळं तुम्हाला मदतच होणार आहे. कारण, आता जुन्या आणि फाटलेल्या नोटा सहजपणे बदलता येणार आहेत. 

नोट बदलण्याची प्रक्रिया कशी असेल? 

PNB बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नोट बदलण्यासाठी तुम्हाला बँकेच्या जवळील शाखेशी संपर्क साधावा लागणार आहे. जिथं तुम्ही नोट किंवा नाणी बदलून घेऊ शकता. सदरील नियम RBI कडूनच जारी करण्यात आले असून, त्यानुसार तुमच्याकडे फाटलेल्या किंवा जुन्या नोटा असतील तर चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही सहजपणे पीएनबीमध्ये जाऊन ती बदलू शकता. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे नोट जितकी वाईट अवस्थेत असेल तितकंच तिचं मूल्य कमी असेल. बँक कर्मचाऱ्यांनी यामध्ये तुमचं सहकार्य करण्यास नकार दिल्यास त्याबाबतची तक्रार करण्याचं स्वातंत्र्यही तुम्हाला असणार आहे.

नोट बदलण्यासाठीचे निकष कोणते? 

RBI च्या माहितीनुसार कोणतीही फायलेली नोट त्याचवेळी स्वीकारली जाईल जेव्हा तिचा एखादा भागच नसेल. दोन तुकडे झालेली, चिकटवलेली नोटही स्वीकारली जाईल पण, महत्त्वाचा भाग मात्र नोटीवरच असणं अपेक्षित आहे.

हेसुद्धा वाचा : मोठी बातमी! ऐन रविवारी मुंबईकरांचा खोळंबा; Mumbai Local कडे पाहूच नका 

महत्त्वाच्या भागांमध्ये नोट जारी करणारी संस्था, संस्थेचं नाव, हमीपत्र, सही, अशोक स्तंभ, महात्मा गांधी यांचा फोटो किंवा नोटवर असणारं वॉटर मार्क नसेल तर मात्र ही नोट बदलता येणं शक्य नाही. वर्षानुवर्षे वापरून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकजे अतिशय जीर्ण स्वरुपात पोहोचलेली नोटसुद्धा पीएनबीकडे बदलली जाऊ शकते. त्यामुळं घरात किंवा तुमच्या खिशात अशा काही नोटा आहेत का पाहा आणि त्या बदलून घ्या.