Real Hero: जेव्हा गडगंज पगार असणारे CEO ओलांडतात सर्व मर्यादा, 100% वाचावी अशी बातमी

काही बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO आहेत. ज्यांनी त्यांचं साधेपण जपत बऱ्याच मर्यादा ओलांडल्या. म्हणूनच की काय, ते कर्मचाऱ्यांच्या अगदी जवळचे ठरत आहेत. 

Updated: Sep 14, 2022, 11:54 AM IST
Real Hero: जेव्हा गडगंज पगार असणारे CEO ओलांडतात सर्व मर्यादा, 100% वाचावी अशी बातमी  title=

Real Hero: जेव्हा गडगंज पगार असणारे CEO ओलांडतात सर्व मर्यादा, 100% वाचावी अशी बातमी 

मुंबई : जर तुम्ही कोणत्या मोठ्या कंपनीचे सीईओ झालात तर त्या पदावर पोहचल्यानतंर बऱ्याच गोष्टी, सवयी अगदी राहणीमानही बदलतंत. जसं की प्रवासासाठी जास्तीच्या विमानांचा वापर करणे, महागड्या हॉटेलात खाणं पिणं करणं आणि बरंच काही. अमुक एका हुद्द्यावर पोहोचल्यानंतर बदलणाऱ्या गोष्टींसोबत इतरांकडून मिळणारा मानही वाढतो. पण, काही अशी माणसंही असतात, जी कायमच आपण सर्वसामान्यांपैकीच एक असल्याचं कधीच विसरत नाहीत. असेच काही बँकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात CEO आहेत. ज्यांनी त्यांचं साधेपण जपत बऱ्याच मर्यादा ओलांडल्या. म्हणूनच की काय, ते कर्मचाऱ्यांच्या अगदी जवळचे ठरत आहेत. 

दिल्ली ते चंदीगडचा प्रवास
बंधन बँक (Bandhan Bank) चे फाउंडर आणि सीईओ CEO चंद्रशेखर घोष (Chandra Shekhar Ghosh) 'The Humble CEO' या नावाने देखील ओळखले जातात. त्याचं कारण असं साधी राहणी - उच्च विचारसरणी. ते यासाठी चर्चेत आले कारण, एका अधिकृत कामादरम्यान त्यांनी दिल्ली ते चंडीगढ़ (Delhi to Chandigarh) या प्रवासात विमानाने प्रवास करण्याऐवजी रेल्वेनं (Shatabdi Train)  प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता.  

घोष यांच्या विनम्र आणि साधेपणाच्या वागणुकीमुळे बँकेचे सर्व अधिकारी नि:शब्द झाले. बंधन बँकच्या मार्केटिंग हेड अपूर्व सरकार (Apurva Sircar) म्हणाले की, चंद्रशेखरसारख्या महान व्यक्तिमध्ये असणारी विनम्रता सामान्य लोकांमध्ये नसते विशेषतः त्यांच्या पदावरील आणि ऐपतीप्रमाणे राहणाऱ्या लोकांमध्ये तर पाहायला नाही मिळत.

सीईओ CEO चा नम्र स्वभावाने जिंकली कर्मचाऱ्यांची मनं 
'बिजनेस टुडे'च्या वृत्तानुसार, अपूर्व सरकार बंधन बँकचे सीईओ CEO चंद्रशेखर घोष  (Chandra Shekhar Ghosh) यांच्या सोबतचा एक अनुभव नुकताच शेअर करत करत, त्यांच्या स्वभावातील साधेपणाचं कौतूक केलं. जेव्हा लोक झटपट प्रवासासाठी विमानांचा वापर करतात तिथे चंद्रशेखर घोष (Chandra Shekhar Ghosh) यांनी ट्रेनने प्रवास करायचा निर्णय घेतला. हा एक निर्णय त्यांना कर्मचाऱ्यांच्या नजरेतही Hero ठरवून गेला. 

शताब्दी एक्सप्रेसने का केला प्रवास?
चंद्रशेखर घोष (Chandra Shekhar Ghosh) यांनीच आपण नेमका रेल्वेनं प्रवास का केला ते स्पष्ट केलं. एका उड्डाणात दुसऱ्या टोकाला पोहोचण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो पण विमानतळावर वाट पाहण्यात त्याहून जास्त वेळ दवडला जातो.  शताब्दी एक्सप्रेसने हे अंतर पार करण्यासाठी जवळजवळ 4 तास इतकाच वेळ जाईल. म्हणून ट्रेनचा प्रवास खुप चांगला पर्याय असेल, असं सोपं गणित त्यांनी सर्वांपुढे मांडलं.

अवघ्या 5 हजार रुपयांपासून सुरुवात करणारे घोष आज कोट्यवधंचे मालक आहेत. पण, त्यांच्या मनाची श्रीमंती त्याहूनही जास्त चर्चेत असते. सीईओ CEO चंद्रशेखर घोष (Chandra Shekhar Ghosh) फक्त ग्रामीण विभाग पाहण्याकरिता ट्रेनचा प्रवास करतात. त्यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक भेटीत आणि गप्पांमध्ये अनेकांना बऱ्याच चांगल्या आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात.