आवडत्या गायकाबरोबर अशी पोज देऊन फोटो काढला की ठरलेलं लग्न मोडलं; जगभरात चर्चा

Man Calls Off Engagement With Fiance After Cosy Photo with Chris Brown :  आवडत्या गायकाबरोबर अशी पोज देऊन फोटो काढला की ठरलेलं लग्न मोडलं

दिक्षा पाटील | Updated: Jun 20, 2024, 04:12 PM IST
आवडत्या गायकाबरोबर अशी पोज देऊन फोटो काढला की ठरलेलं लग्न मोडलं; जगभरात चर्चा title=
(Photo Credit : Social Media)

Man Calls Off Engagement With Fiance After Cosy Photo with Chris Brown : आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला पाहिलं की आपण नेहमीच उत्सुक होतो. अनेकदा लोकं खूप भावूक होतात. काही लोकांचे आनंदाश्रू पाहायला मिळतात तर काही लोकांना इतका आनंद होतो की ते काही बोलण्याच्या परिस्थितीत नसतात. असाच काहीसा प्रकार एका अमेरिकेच्या गायक आणि रॅपरसोबत घडला आहे. खरंतर त्या रॅपरसोबत काढलेल्या फोटोमुळे एका मुलीचं लग्न मोडलं आहे. आता हा कोणता गायक आणि रॅपर आहे त्याविषयी जाणून घेऊया.

हा एक अमेरिकनं गायक आणि रॅपर क्रिस ब्राईनचे लाखो चाहते आहेत. त्यातही महिलांची संख्या ही सगळ्यात जास्त आहे. दरम्यान, नुकत्याच एका मीट आणि ग्रीट कार्यक्रमा दरम्यान एक महिला चाहती खूप जास्त कोझी झाली आहे. त्याचा फोटो हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत पाहायला मिळतंय की क्रिस ब्राईननं त्याच्या या महिला चाहतीला चक्क कडेवर उचलून घेतलं आहे. इतकंच नाही तर तिनं त्याला मिठी मारली आहे. त्या तरुणीचा क्रिस ब्राईनसोबतचा फोटो पाहिल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडनं ठरलेलं लग्न मोडलं आहे. 

तिच्या बॉयफ्रेंडनं फेसबूकवर पोस्ट शेअर करत या सगळ्या प्रकरणाला वाईट आणि लाजिरवाणं म्हटलं आहे. "मला खूप दु: ख झालं आहे. मला खूप लाज वाटते. एकदा मी हा फोटो पाहिला आणि हे देखील पाहिलं की कशा प्रकारे हा फोटो सोशल मीडियावर असंवेदनशीलपणे कमेंटमुळे व्हायरल होतोय. मी लगेच लग्न मोडलं. जीससच्या मार्गदर्शनानं नवीन मार्ग मिळेपर्यंत जिमला जातोय आणि नंतर येशूसोबत नवीन जीनव सुरु करेन. तिला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाला धन्यवाद!"

हेही वाचा : प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले तेवढ्यात प्रभासनं...

खरंतर क्रिस ब्राऊंनमुळे कोणचं नात तुटणं ही पहिली वेळ नाही. तर या आधी देखील एका तरुणीनं खुलासा केला होता की सोशल मीडियावर तिचा आणि क्रिस ब्राऊंचचा फोटो पाहिल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडनं तिच्यासोबत ब्रेकअप केलं. क्रिस ब्राऊं हा सध्या त्याच्या 11:11 टूरवर आहे. त्याची सुरुवात ही याच महिन्यात Detroit पासून झाली आहे.