VIDEO : प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले तेवढ्यात प्रभासनं...

Deepika Padukone, Prabhas and Amitabh Bachchan's Video : दीपिका पदुकोण प्रभास अमिताभ बच्चन यांच्या त्या व्हिडीओनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

दिक्षा पाटील | Updated: Jun 20, 2024, 03:42 PM IST
VIDEO : प्रेग्नंट दीपिकाला मदत करण्यासाठी अमिताभ बच्चन पुढे आले तेवढ्यात प्रभासनं... title=
(Photo Credit : Social Media)

Deepika Padukone, Prabhas and Amitabh Bachchan's Video : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. तिच्या प्रेग्नंसी काळातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. सध्या दीपिकाचा 'कल्कि ' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. त्यावेळी दीपिकाची संपूर्ण कल्कीच्या टीमनं काळजी घेतली आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. स्टेजवरून खाली येणाऱ्या दीपिकाला कशा प्रकारे इतक कलाकार मदत करताना ते पाहायला मिळतंय. 

दीपिका, प्रभास आणि अमिताभ बच्चन यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळते की दीपिका स्टेजवरून खाली येताना तिला सावरण्यासाठी अमिताभ बच्चन हात देतात. तर लगेच प्रभास त्यांच्यामध्ये येतो. त्यानंतर हे पाहता अमिताभ त्याची मस्करी करतात आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांना हसू अनावर झालं. खरंतर यावेळी अमिताभ हे प्रभासच्या पाठीवर थाप मारत म्हणाले की 'ही संधी तू कशी मिळवलीस?' दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन हे मदत करणं विसरलेलं नाही. तर काही नेटकऱ्यांनी प्रभास आणि अमिताभ या दोघांसाठी असलेला आदर वाढल्याचे सांगितले. तर दुसरा नेटकरी म्हणाला की, 'प्रेग्नंसीमध्ये हिल्स कोण घालतं. तिसरा नेटकरी म्हणाला, प्रेग्नंसीमध्ये सताना तिने इतके उंच हिल्स घालणे कितपत योग्य आहे? अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

'कल्कि 2898 एडी' चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर अमिताभ बच्चन, प्रभास, कमल हसन आणि दीपिका पदुकोण हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. 27 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

हेही वाचा : 'लाज वाटायला हवी...'; वसईत भररस्त्यात तरुणीची हत्या झाल्यानंतर रवीना टंडन संतप्त; म्हणाली, 'तिला वाचवू...'

दीपिका आणि रणवीरनं जेव्हा पासून त्यांच्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. तेव्हापासून त्यांचे चाहते खूप उत्साही आहेत. इतकंच नाही तर नेटकरी हे सतत त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर सप्टेंबर महिन्यात दीपिका आई होणार आहे.