IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामना होणार रद्द? 'या' कारणाने चाहत्यांचं टेन्शन वाढलं

IND vs AFG Weather Report And Forecast: लीग स्टेजमधील 3 सामने टीम इंडियाने न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर खेळले. यावेळी टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द होणार का? 

सुरभि जगदीश | Updated: Jun 20, 2024, 03:39 PM IST
IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामना होणार रद्द? 'या' कारणाने चाहत्यांचं टेन्शन वाढलं title=

IND vs AFG Weather Report And Forecast: टी-2 वर्ल्डकपमध्ये आज 43 वा सामना खेळवण्यात येणार आहे. बारबाडोसमध्ये केंसिंग्टन ओवल स्टेडियममध्ये भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 8 वाजता हा सामना सुरु होणार आहे. भारतीय चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता आहे, मात्र चाहत्यांच्या उत्सुकतेवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना रद्द होण्याची शक्यता आहे.  

लीग स्टेजमधील 3 सामने टीम इंडियाने न्यूयॉर्कच्या स्टेडियमवर खेळले. यावेळी टीम इंडियाला ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध खेळायचा होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामनाही पावसामुळे रद्द होणार का? असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. याआधीही बार्बाडोसमधील एक सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

कसा आहे बारबाडोसमधील हवामान

Weather.com नुसार, बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमधील केन्सिंग्टन ओव्हल या ठिकाणी आज ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान म्हणजेच सकाळी 10 च्या सुमारास पावसाची शक्यता 10 ते 20 टक्के वर्तवण्यात आली होती. मात्र संध्याकाळच्या वेळेस चाहत्यांना पूर्ण सामना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पाहता येणार आहे, अशी आशा व्यक्त कऱण्यात येतेय. सामन्यादरम्यान तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते. आता सामन्यात पाऊस खेळ करणार का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. 

पावसाने एक सामना झाला होता रद्द

बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलमध्ये सामना पावसामुळे रद्द झाला तर ही भारतीय चाहत्यांसाठी चिंतेची बाब असणार आहे. यापूर्वी या ठिकाणी झालेल्या इंग्लंड आणि स्कॉटलंड सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. त्यावेळी या सामन्यात दोनदा पाऊस पडला होता. या सामन्यात दुसऱ्या वेळी असा पाऊस पडला की सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही.

कशी असेल अफगाणिस्तानविरूद्ध संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.