पैसाच पैसा! राकेश झुनझुनवालांचा आवडता स्टॉक पुन्हा तुफान कमाईच्या तयारीत; तुमच्याकडे आहे का?

Tata Group Stock तुम्हाला वर्षभराच्या गुंतवणूकीतून चांगले रिटर्न्स मिळवायचे असतील तर, टाटा ग्रुपचे दमदार स्टॉक चांगले पर्याय ठरू शकतात.

Updated: Feb 9, 2022, 10:53 AM IST
पैसाच पैसा! राकेश झुनझुनवालांचा आवडता स्टॉक पुन्हा तुफान कमाईच्या तयारीत; तुमच्याकडे आहे का? title=

मुंबई : बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आणि 'बिग बुल'  राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे अनेक गुंतवणूकदारांचे लक्ष असते. त्यांच्या पोर्टफोलिओचा अंदाज घेऊन किरकोळ गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलियोला आकार देत असतात. राकेश झुनझुनवाला यांचा पसंतीचा शेअर टायटन  (Titan Company Ltd) अद्यापही त्यांच्या पोर्टफोलिओची शान वाढवत आहे. टायटनच्या निकालांनंतर अनेक ब्रोकरेज फर्म्सने टायटनमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.

मोतीलाल ओसवाल यांनी संशोधनाच्या आधारावर टायटनवर गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या स्टॉकवर गुंतवणूकीसह 2900 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले आहे. स्टॉक 2900 रुपयांपर्यंत पोहचण्यासाठी वर्षभराचा कालावधीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 8 फेब्रुवारी 2022 रोजी टायटनची किंमत सुमारे 2,442 रुपये होती.

गुंतवणूकदारांनी सध्याच्या किंमतीवरून खरेदी केल्यास 458 रुपये प्रति शेअर किंवा सध्याच्या किमतीच्या सुमारे 19 टक्के परतावा मिळू शकतो. गेल्या वर्षभराबद्दल बोलायचे झाले तर हा शेअर जवळपास 57 टक्क्यांनी वधारला आहे. 

टाटा समूहाचा हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या परताव्याच्या तक्त्यावर नजर टाकल्यास गुंतवणूकदारांना 465 टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे.

Titan: राकेश झुनझुनवाला यांचा आवडता स्टॉक

दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओमध्ये टाटा समूहाचा टायटन हा आवडता स्टॉक आहे. डिसेंबर 2021 च्या तिमाही डेटानुसार, राकेश झुनझुनवाला अँड असोसिएट्सची टायटन होल्डिंग 5.1 टक्के आहे. 8 फेब्रुवारी 2022 रोजी त्याचे मूल्य 11,057.8 कोटी रुपये होते.

ट्रेंडलाइननुसार, राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या 37 स्टॉक्स आहेत, ज्यांची एकूण संपत्ती 34,396.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे.

Q3: टायटनचा निकाल 

टायटनचा निव्वळ नफा डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 91 टक्क्यांनी वाढून 1,012 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 530 कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

ग्राहकांच्या मागणीमुळे कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून रु. 10,094 कोटी झाले, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत रु. 7,659 कोटी होते.