नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिट इंडिया मोहीम हाती घेतली आहे. राज्यवर्धन सिंह राठोड यांनी त्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये डिप्स मारले. त्याचा व्हिडीओही त्यांनी सोशल मीडियावर अपलोड केलाय. हम फिट तो इंडिया फिट या हॅश टॅग अंतर्गत राठोड यांनी विराट कोहली, ऋतिक रोशन आणि सायना नेहवाल यांना चॅलेंज दिलंय. राठोड यांच्या या व्हिडीओला मोठा प्रतिसाद मिळतोय. अनेकांनी व्यायाम करतानाचे व्हिडीओ शेअर केले आहेत.
भारत तंदुरुस्त राहण्यासाठी प्रत्येकानं तंदुरुस्त राहायला हवं, असं राज्यवर्धन राठोड यांनी म्हंटलंय. राज्यवर्धन राठोड स्वत: खेळाडू असून २००४ साली त्यांनी ऑलंपिक नेमबाजी स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक मिळवलंय. राज्यवर्धन राठोड यांनी दिलेलं चॅलेंज स्वीकारत सायना नेहवालनंही तिचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय.