व्हिडिओ : फिल्मी स्टाईलमध्ये आकाशात केलं प्रपोझ..

व्हिडिओ : फिल्मी स्टाईलमध्ये आकाशात केलं प्रपोझ.. title=

मुंबई : असं चित्र फक्त आपण बॉलिवूड सिनेमांतच होताना पाहिलं आहे. मात्र आता ही गोष्ट खऱ्या आयुष्यात देखील घडली आहे. सिनेमांत ज्याप्रमाणे एक अभिनेता अभिनेत्रीला उंच आकाशात असलेल्या विमानात प्रपोझ करतो. अगदी तसंच काही काहीशी गोष्ट इंदौर एअरपोर्टवर घडली आहे. एका युवकाने आपल्या प्रियसीला लग्नासाठी प्रपोझ केलं आहे. 

ही घटना रविवारी 20 मे रोजी घडली आहे. एका युवकाने आपल्या प्रियसीला फ्लाइटच्या आतमध्ये प्रपोझ केलं आहे. प्रपोझ करताना याने गाणं गायलं. सगळे प्रवासी ही गोष्ट बघून अगदीच गोंधळले. मजेची गोष्ट अशी आहे की, इंडिगो फ्लाइटचे स्टाफने या युवकाची मदत केली. इंडिगोचा सगळा फ्लाइट स्टाफ हातात पोस्टर घेऊन उभे होते. ज्यामध्ये लिहिलं होतं की, विल यू मॅरी मी..

हा सगळा प्रकार पाहताच ती मुलगी खूष झाली. या प्रकाराने भावूक झालेल्या मुलीने लगेचच मुलाला मिठी मारली. आणि त्याने या हटके स्टाईलने प्रपोझ केलेल्या मुलाला लग्नासाठी होकार दिला. काही लोकांनी हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलवर रेकॉर्ड केला आणि त्याचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर भरपूर लोकप्रिय होत आहे.