राज्यवर्धन राठोड बनले भारताचे नवे क्रीडामंत्री

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आलाय. या विस्ताराता नव्या ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. 

Updated: Sep 3, 2017, 04:34 PM IST
राज्यवर्धन राठोड बनले भारताचे नवे क्रीडामंत्री title=

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आलाय. या विस्ताराता नव्या ९ मंत्र्यांचा समावेश करण्यात आलाय. 

अथेन्स ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत रौप्यपदक जिंकणाऱ्या राज्यवर्धन सिंह राठोड यांची क्रीडामंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलीये. विजय गोएल यांच्या जागी राज्यवर्धन यांची नियुक्ती करण्यात आलीये.

४७ वर्षीय राठोड यांच्याकडे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे खाते होते. त्यांच्याकडे आता क्रीडामंत्रीपद सोपवण्यात आलेय. 

आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात काही नेत्यांना बढती देण्यात आलीये. तर शिवप्रताप शुक्ल, अश्विनीकुमार चौबे, विरेंद्र कुमार, अनंतकुमार हेगडे, राजकुमार सिंग, हरदीपसिंग पुरी, सत्यपाल सिंग, गजेंद्रसिंह शेखावत, अल्फोन्स कन्ननथानम यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेय.