नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पियूष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय खातं सोपवण्यात आलं आहे.
अरुण जेटली यांच्याकडे असलेल्या संरक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळालेल्या निर्मला सीतारमन देशाच्या नव्या संरक्षण मंत्री बनल्या आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतर संरक्षण मंत्रीपदी वर्णी लागलेल्या निर्मला सीतारमन या दुस-या महिला ठरल्या आहेत.
धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, निर्मला सीतारमण आणि मुख्तार अब्बास नकवी यांचं प्रमोशन झालं आहे. त्यांना कॅबिनेटमध्ये समाविष्ट केलं गेलं आहे.