Rajnath Singh यांनी भोगलाय 18 महिन्याचा तुरुंगवास; जेलमधून बाहेर आल्यानंतर कळालं की...

Rajnath Singh On Jail Memory: राजनाथ सिंह तुरुंगातून बाहेर येताच आयुष्याला वेगळे वळण लागणार होते याची त्यांना देखील कल्पना नव्हती. तुरुंगवास भोगून ते घरी पोहोचले खरे पण काही दिवसात वेगळी कारकीर्द त्यांची वाट पाहत होती. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 10, 2023, 10:08 AM IST
Rajnath Singh यांनी भोगलाय 18 महिन्याचा तुरुंगवास; जेलमधून बाहेर आल्यानंतर कळालं की... title=

Rajnath Singh Birthday: भारताचे संरक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांचा आज (10 जुलै) वाढदिवस आहे. राजनाथ सिंह यांचा जन्म यूपीमधील एका छोट्या गावात 10 जुलै 1951 रोजी झाला. एका सर्वसाधारण कुटुंबातून येऊनही त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ते गृहमंत्री आणि देशाचे संरक्षण मंत्री असा प्रवास केला. राजनाथ सिंह यांना त्यांच्या तारुण्यात 18 महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांना जे कळालं त्यामुळे त्यांचे आयुष्य पालटून गेलं. वयाच्या तेविशीत असं काय घडलं हे आपण जाणून घेऊया.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ४७ वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या आणीबाणीची आठवण करून दिली. आणीबाणीच्या काळात त्यांनी केलेल्या संघर्षाच्या आठवणीत त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या. वयाच्या 23 व्या वर्षी मला18 महिने तुरुंगात टाकण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली.

लखनौ येथील एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना राजनाथ सिंह बोलत होते. राजनाथ सिंह यांना विद्यार्थीदशेपासूनच राजकारणात रस आहे. 

'मला माझ्या विद्यार्थी जीवनापासून राजकारणात रस होता आणि नंतर मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मध्ये सामील झालो. हळूहळू मी राजकारणाकडे वाटचाल करत राहिल्याचे त्यांनी सांगितले. आणीबाणीच्या काळात मला तुरुंगात टाकले गेले, यावरुन मी किती सभ्य तरुण होतो हे लक्षात येईल अशी मिश्किल टिप्पणी यावेळी त्यांनी केली. 

तुरुंगात घालवलेले दिवस आठवले
राजनाथ सिंह यांना आयएएस बनायचे होते. त्यासाठी ते प्रयत्नशील होते. दरम्यान आणीबाणी लागू झाली तेव्हा मीही आंदोलनात सामील झालो होतो. मी 18 महिने तुरुंगात होतो. दर आयएएसचे स्पप्न  विसरलो होतो, असे ते म्हणाले.

तुरुंगातून बाहेर येताच आयुष्याला वेगळे वळण लागणार होते याची त्यांना देखील कल्पना नव्हती. तुरुंगवास भोगून ते घरी पोहोचले खरे पण काही दिवसात वेगळी कारकीर्द त्यांची वाट पाहत होती. त्यांना खासदाराचे तिकीट मिळाले होते.  राजनाथ सिंह यांनी तारुण्यातील आठवणींना अशाप्रकारे उजाळा दिला. 

राजकारण्यांवरचा विश्वास उडण्याचे सांगितले कारण 

ज्या दिवशी या देशातील राजकीय नेते नाही म्हणायला शिकतील आणि नोकरशहा हो म्हणायला शिकतील, त्या दिवशी या हा देश भरभराटीला येईल, असे ते यावेळी म्हणाले. राजकारणी प्रत्येक गोष्टीला हो म्हणत आहेत, जे करू शकत नाही ते देखील करु शकतो असा विश्वास ते जनतेला देतात.

त्यामुळे लोकांचा राजकारण्यांवरचा विश्वास उडत आहे. केलेले काम आणि तुमचे बोलणे यात फरक नसावा, असेही ते म्हणाले. त्यामुळेच जनतेचा राजकारण्यांवर विश्वास बसत नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले.