Delhi Metro ट्रेनचे दरवाजे उघडताच तरुणीचं विचित्र कृत्य, VIDEO पाहून नेटकरी संतापले

Delhi Metro Video : सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तरुणीचं मेट्रोमधील विचित्र कृत्य नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

नेहा चौधरी | Updated: Jul 10, 2023, 10:00 AM IST
Delhi Metro ट्रेनचे दरवाजे उघडताच तरुणीचं विचित्र कृत्य, VIDEO पाहून नेटकरी संतापले title=
girl dancing in Delhi Metro video viral on Internet Trending video on google news today

Girl Dancing In Delhi Metro : डीएमअरसी दिल्ली मेट्रोने वारंवार आवाहन करुनही मेट्रोमध्ये विचित्र व्हिडीओ बनवण्याचे काही कमी होताना दिसत नाही आहे. अजून एका तरुणीचा विचित्र व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकरी हा व्हिडीओ पाहून संतापले आहेत. दिल्ली मेट्रोमधून एका तरुणीने बिकिनी घालून प्रवास केला. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर दिल्ली मेट्रो सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये होती. 

दिल्ली मेट्रोमधील एकशेएक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले होते. त्यातील मेट्रोमध्ये कपलचे किस करणे, त्यानंतर एका व्यक्तीचं तरुणीशेजारी हस्तमैथुन करणं असे अनेक अश्लिल व्हिडीओही व्हायरल झाले. दिल्ली मेट्रोमध्ये काय सुरु आहे, यावर कोणाचं नियंत्रण नाही का, अगदी दिल्ली महिला आयोगाने हे मेट्रोमधील या व्हिडीओची दखल घेतली होती.  (girl dancing in Delhi Metro video viral on Internet Trending video on google news today )

तरुणीचा अजब डान्स 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी दिल्ली मेट्रो प्लॅटफॉर्मवर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर ट्रेंडिंगमध्ये आहे. ही तरुणी मेट्रोमध्ये नाचता नाचता प्लॅटफॉर्मवरही नाचताना दिसत आहे. सीमा कनोजिया असं या तरुणीचं नाव बोलं जातं आहे. 

तिचं हे अजब आणि विचित्र नृत्य पाहून अनेकांना धक्का बसला आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. डीएमआरसीच्या नियमांचं अशा प्रकारे वारंवार उल्लंघन करणे, अवमान करणे योग्य नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणं आहे. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्टाग्रामवर seemakanojiya87 या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर आतापर्यंत 14 हजारांहून अधिक यूजर्सने तो लाइक केला आहे. मात्र कंमेंट बॉक्स पाहिलं तर नेटकऱ्यांनी त्या तरुणीवर टीका केली आहे. 

मेट्रोमध्ये अशा प्रकारचे व्हिडीओ काढणाऱ्या यूजर्समुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय, असं दिल्लीकरांचं म्हणं आहे.

 

हेसुद्धा वाचा - मध्यप्रदेश लघुशंका प्रकरणातील पीडित तरुणाने अखेर दिली प्रतिक्रिया; म्हणाला "ज्याने चूक केली, त्याला..."

 

दरम्यान DMRC कडून भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून दिल्ली मेट्रोमध्ये सुरक्षा पथकं तैनात करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.