Viral Video : गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडच्या गुपचूप भेटीचे अनेक मजेदार किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. बॉलिवुडच्या चित्रपटांमध्येही असे प्रसंग दाखवण्यात आले आहेत. मात्र कधी कधी ही चोरी पकडली जाते. असाच काहीसा प्रकार राजस्थानमध्येही घडलाय. या गुपचूप भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक तरुण त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी मध्यरात्री घरी पोहोचला होता, मात्र तो पकडला गेला. घरच्यांनी शोधाशोध केल्यानतंर हा प्रियकर चक्क कूलरमध्ये सापडला. मात्र व्हायरल झालेला व्हिडिओ किती जुना आहे आणि तो राजस्थानमधील कोणत्या शहराचा आहे याची माहिती मिळालेली नाही.
या हास्यास्पद घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या तरुणाने रात्री त्याच्या प्रेयसीच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो अडचणीत सापडला. प्रेयसीला भेटण्यासाठी तो घरात गेला तेव्हा या भेटीला अनपेक्षित वळण लागले. प्रेयसीच्या घरच्यांपासून वाचण्यासाठी तरुणाने अशी जागा निवडली की कुणीच कल्पना करु शकणार नाही. कुटुंबियांनी कुलरची तपासणी केली असता आतमध्ये प्रियकर लपून बसला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला तेव्हा घरच्यांना कुणकुण लागली. घरात चोर घुसल्याचा संशय कुटुंबीयांना आला. त्यामुळे घराची झडती सुरू करण्यात आली. घराबाहेर कुत्र्यांच्या भुंकण्याने कुटुंबीय जागे झाले होते. यानंतर शोध सुरू असताना कुलरमध्ये कोणीतरी असल्याचा संशय आल्याने कुलर फिरवून पाहिल्यावर तरुणाचे सत्य समोर आले.
दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार प्रियकर प्रेयसीच्या कुटुंबीयांनाही ओळखत असल्याचे समोर आलं आहे. व्हिडिओमध्ये ती महिला राजस्थानी भाषेत, या तरुणाची पत्नी तिचा शोध घेत आहे, असे म्हणताना दिसत आहे. यावरून तो तरुण विवाहित असल्याचे उघड झाले आहे. यावेळी, कुटुंबातील एक महिला तरुण आणि त्याच्या प्रेयसीला ओरडताना दिसता आहे.
Kalesh b/w a Guy and girl family over he came to meet her at night and her family caught him inside cooler in Rajasthan pic.twitter.com/bepkikh2Di
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) November 4, 2023
दुसरीकडे, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने पकडला गेला असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने टेक्निकच चुकीची आहे, या थंडीत कूलरमध्ये कोण लपते?' असे म्हटलं आहे. आणखी एका युजरने कुलर ठिक करायला आला होता असं म्हटलं आहे.