महिला हवालदाराने प्रियकरासह मिळून पतीची केली हत्या; नव्या घराशेजारीच पुरला मृतदेह

Rajasthan Crime : राजस्थानच्या भरतपूरमध्ये महिला हवालदाराने पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला प्रियकरासह अटक केली आहे. पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याचा मृतदेह जमिनीत पुरला होता.

आकाश नेटके | Updated: Aug 7, 2023, 07:46 AM IST
महिला हवालदाराने प्रियकरासह मिळून पतीची केली हत्या; नव्या घराशेजारीच पुरला मृतदेह title=

Crime News : राजस्थानच्या (Rajasthan Crime) भरतपूरमध्ये (Bharatpur) खुनाची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्लीतल्या सीआरपीएफमधील (CRPF) महिला हवालदाराने  तिच्या प्रियकरासह मिळून पतीची हत्या केली. त्यानंतर महिला हवालदाराने तिच्या प्रियकराच्या मदतीने भरतपूरच्या बन्सूरमध्ये खड्डा खोदून पतीचा मृतदेह पुरला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा प्रियकरही सीआरपीएफमध्ये तैनात आहे. दिल्लीत (Delhi) पतीची हत्या केल्यानंतर महिलेने मृतदेह आणून अलवरच्या बनसूर येथील एका मोकळ्या जागेत पुरला होता. पोलिसांनी (Rajasthan Police) रविवारी जमीन खोदून मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नव्या घराशेजारीच पुरला मृतदेह

मथुरेला लागून असलेल्या भरतपूर जिल्ह्यात सीआरपीएफमध्ये तैनात असलेल्या या महिला हवालदाराने तिच्या प्रियकरासह पतीची हत्या केली आहे. यानंतर पतीचा मृतदेह दिल्लीहून आणून अलवरच्या बन्सूरमध्ये एका प्लॉटमध्ये पुरण्यात आला होता. पोलिसांनी रविवारी जमीन खोदून मृतदेह बाहेर काढल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. या खून प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी सांगितले की, दोन्ही आरोपींनी मृतदेह दिल्लीहून कारने अलवर येथे आणण्यात आला होता. आरोपी प्रियकराने त्याच्या नव्याने बांधलेल्या घराजवळच पतीचा मृतदेह पुरला.

अडीच वर्षांपासून होते प्रेमसंबध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम संजय जाट (32) ही सीआरपीएफमध्ये हवालदार असून दिल्लीत तैनात आहेत. पूनमचे ​​अनेक दिवसांपासून अलवर येथील रामप्रताप गुर्जर याच्याशी प्रेमसंबंध होते. रामप्रतापही सीआरपीएफमध्ये असून तो नागालँडमध्ये तैनात आहेत. पूनम आणि रामप्रताप अडीच वर्षांपूर्वी श्रीनगर विमानतळावर भेटले होते आणि तेव्हापासून त्यांचे प्रेमसंबंध सुरू होते. तर पूनमशी 2010 मध्ये संजयचे लग्न झाले होते. पूनम दिल्लीतील द्वारका सेक्टर-8 येथील मेट्रो स्टेशनवर अडीच वर्षांपासून तैनात आहे.  दोघांनी संजयला मार्गातून हटवण्याचा कट होता. दोघांनी दिल्लीत संजयची हत्या केल्यानंतर बनसूर येथील बायपास रोडवरील विवेकानंद पब्लिक स्कूलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत मृतदेह पुरला होता.

चौकशीत दिली हत्येची कबुली

बरेच दिवस संजय सोबत संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी दिल्लीत असलेल्या त्याने पूनमला फोन करून पतीबद्दल विचारले होते. मात्र संजय तेथे आला नसल्याचे पूनमने सांगितले. यानंतर नातेवाइकांनी 4 ऑगस्ट रोजी खोह पोलीस ठाण्यात संजय बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला आणि त्यांना पूनम आणि रामप्रताप यांनीच संजयची हत्या करून मृतदेह लपवल्याचा त्याला संशय आला. पोलिसांनी रामप्रताप आणि पूनम यांची कोठडीत चौकशी केली असता, दोघांनी संजयची हत्या करून मृतदेह पुरल्याची कबुली दिली.

पूनमनेच संजयला फोन करुन दिल्लीला बोलवलं होतं असे त्याच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते. 31 जुलै रोजी सकाळी 8.30 वाजता संजय दिल्लीला रवाना झाला होता. संध्याकाळी 5 वाजता मी संजयशी बोललो तेव्हा तो म्हणाला की तो अजूनही मेट्रोत बसला आहे, जाऊन पूनमशी बोलेल. त्यानंतर संजयचा फोन झाला. त्यानंतर पूनमला फोन केला आणि संजय बद्दल विचारले तर तिने सांगितले कि संजय तिथे आला नाही, असे संजयच्या वडिलांनी सांगितले.

दिल्लीत हत्या, राजस्थानमध्ये मृतदेह पुरला

आरोपींनी कट आखला आणि संजयला दिल्लीला बोलावले आणि गाडीत बसवून त्याची गळा आवळून हत्या केली. यानंतर पूनम दिल्लीत थांबली आणि तिने रामप्रतापला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पाठवले. रामप्रताप मृतदेह घेऊन बनसूर येथे पोहोचला आणि तिथल्या रिकाम्या प्लॉटमध्ये मृतदेहाचे पुरला. रामप्रतापने जिथे मृतदेह पुरला तिथे शेजारीच त्याने नवीन घर बांधले होते.