Trenidng News : विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झालेल्या भाजपच्या एका मंत्र्याने केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. सोशल मीडियावर हे वक्तव्य व्हायरल झआलं असून विरोध पक्षांनी भाजप मंत्र्यावर (BJP Minister) जोरदार टीका केली आहे. राजस्थानचे मुख्यमत्री भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) हे उदयपूरमध्ये विकसिती भारत संकल्प यात्रेत सहभागी होण्यासाी आले होते. या कार्यक्रमात आदिवासी मंत्री बाबूलाल खराडी (Babulal Kharadi) हे देखील सहभागी झाले होते. या यात्रेत संबोधित करताना त्यांनी लोकांना अजब सल्ला दिला. आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या योजनांची माहिती दिली. पण ही देताना त्यांची जीभ घसरली.
काय म्हणाले बाबूलाल खराडी?
बाबूलाल खराडी यांनी आपल्या भाषणात बोलताना पंतप्रधान मोदी यांचं कोणीही उपाशीपोटी राहू नये, प्रत्येकाच्या डोक्यावर छत असावं असं स्वप्न असल्याचं सांगितलं. पण या पुढे बोलताना त्यांनी तुम्ही भरपूर मुलं जन्माला घाला पंतप्रधान मोदी त्यांना घरं देतील असं वादग्रस्त वक्तव्यही केलं. बाबूलाल खराडी यांचा हा अजब सल्ला ऐकून यात्रेला उपस्थित लोकं हैराण झाली.
बाबूलाल खराडी यांनी माजी काँग्रेस सरकारवर (Congress Government) पेपर घोटाळा, महिला सुरक्षा आणइ भ्रष्टाचारासहित अेक गंभीर आरोप केले. त्याचबरोबर केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनांचं कौतुक केलं. जास्तीत जास्त पात्र लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
'भरपूर मुलं जन्माला घाला'
पण योजनांची माहिती देण्याच्या भरात त्यांनी लोकांना भरपूर मुलं जन्माला घालण्याचा सल्लाही दिला. पंतप्रधान मोदी देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, प्रत्येकाच्या डोक्यावर घर असावं असं पीएम मोदींचं स्वप्न आहे, असंही खराडी यांनी सांगितलं. उज्ज्वला योजना आणि दारीद्र रेषेखालील कुटुंबियांना 450 रुपायांनी सिलेंड दिला जात आहे. आपल्या भाषणात खराडी यांनी आता सिलेंडर महाग वाटतो का, की आणखी स्वस्त करायला हवा असा प्रश्नही विचारला. यानंतर त्यांनी रस्ते, वीजेचा प्रश्नही सोडवायचा असल्याचं सांगितलं.
बाबूलाल खराडी हे उदयपूर जिल्ह्यातील झाडोल मतदारसंघाचे आमदार आहेत. बाबूलाल खराडी यांना दोन पत्नी आणि आठ मुलं आहे. यात चार मुलं आणि चार मुली आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंब उदयपूर जिल्ह्यातील कोटडा तालुक्यातील निचला थला गावात राहतात.