पावसात भिजलेले बूट घरच्याघरी लवकरात लवकर सुकवायचे आहेत? 'या' 3 गोष्टी ट्राय कराच

Monsoon Tips How to Dry Shoes at Home: आपल्यापैकी अनेकांना पावसाळ्यामध्ये जाणवणाऱ्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांपैकी महत्त्वाची समस्या म्हणजे ओले बूट. एकदा का बूट ओले झाले की ते लवकरच सुकत नाहीत. मात्र बूट सुकवण्याच्या 3 सोप्या पद्धतींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 5, 2023, 03:59 PM IST
पावसात भिजलेले बूट घरच्याघरी लवकरात लवकर सुकवायचे आहेत? 'या' 3 गोष्टी ट्राय कराच title=
अनेकांना ओले झालेले बूट कसे सुकवावेत हे कळत नाही

Monsoon Tips How to Dry Shoes at Home: 'माझा आवडता ऋतू' या विषयावर निबंध लिहायला सांगितल्यानंतर सर्वात आधी डोळ्यासमोर येणारा ऋतू म्हणजे पावसाळा. अर्थात आपल्यापैकी अनेकांना हे लागू असेल. पण खरोखरच पावसाळ्यामधील निसर्ग सौंदर्यापासून ते अल्हाददायक वातावरणापर्यंत अनेक गोष्टी हव्याहव्याश्या वाटतात. मात्र त्याचवेळी पावसात भिजून एखाद्या ठिकाणी जाणं किंवा संपूर्ण दिवस ऑफिसला बसणं फार कठीण होऊन जातं. ओले कपडे किंवा अंगावरील ओल्या गोष्टींमुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेकांना बूट टाळता येत नाहीत

पवासाळ्यामध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे ओले होणारे बूट. अनेकांना सॅण्डल वापरणं जमत नाही. त्यातही शाळा किंवा कॉर्परेट कंपन्यांमध्ये बूट घालूनच जावं लागतं. त्यामुळे बूट भिजले तर ते घरच्या घरी सुकवायचे कसे असा प्रश्न अनेकांना सतावतो. कपडे वाळत नाहीत आणि बूटही वाळत नाही या 2 फार कॉमन समस्या पावसाळ्यामध्ये भेडसावतात. मात्र बूट घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे वाळवावेत हे अनेकांना ठाऊक नसतं. त्यात ओले बूट घातल्यास त्यांना कुबट वास येतो. त्यामुळेच बूट वाळवायचे कसे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल या लेखात आपण जाणून घेणार आहोत त्याचसंर्भातील 3 खास टीप्स...

1) कागद

> काचा पुसण्याबरोबरच कागदाचा (जुन्या/ रद्दीतील वृत्तपत्रांचा) वापर ओले झालेले बूट सुकवण्यासाठी करता येतो. हा फार परिणामकारक मार्ग आहे. 

> बुटांचे आतील सोल बाहेर काढून वाळत घाला. त्यानंतर रिकाम्या बुटांमध्ये कागदाचे बोळे भरुन बूट नीट प्रेस करा.

बुटामधील कागदाचे हे बोळे तसेच ठेवा. बुट कागदामध्ये गुंडाळून घ्या. त्यानंतर या कागदाने गुंडाळलेल्या बुटांना रबर बांधा. अशाच अवस्थेत काही तास बूट ठेऊन द्या. काही तासांमध्ये कागद बुटांमधील पाणी शोसून घेईल. 

2) टेबल फॅन

> पावसाळ्यामध्ये बूट उन्हाळ वाळवणे शक्य होत नाही. त्यामुळेच पावसाळ्यात बूट सुकवण्यासाठी टेबल फॅनचा परिणामकारकपणे उपयोग करता येईल. 

> टेबल फॅन फूल स्पीटमध्ये ठेऊन त्यासमोर ओले बूट ठेवावेत. फॅनच्या हवेने बुटामधील पाणी काही वेळात आपोआप सुकून जाईल. काही तास बूट असेच ठेवल्यास त्यामधील मॅइश्चर म्हणजेच ओलावाही निघून जाईल.

3) हेअर ड्रायर

> पावसात भिजलेले बूट सुकवण्यासाठी आणखीन एक घरगुती मार्ग म्हणजे केस वाळवण्यासाठी वापरला जाणारा हेअर ड्रायर. 

> हेअर ड्रायर हिटींग मोडवर ठेऊन सुरु करावा आणि बुटांच्या आत या हेअर ड्रायरमधून निघणारी गरम हवा सोडावी. 

> त्यानंतर काही तास नॉर्मल मोडवर ठेऊन बुटांवर हवा मारत रहावी. असं केल्याने काही तासांमध्ये बूट सुकतील. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)