देशात विक्रम : केवळ 26 दिवसांत डोंगर पोखरुन रेल्वेचा बोगदा तयार

Indian Railway: उत्तराखंडमधील ऋषिकेश ते कर्णप्रयाग या रेल्वे मार्गाच्या कामाचा वेग वाढला आहे. 16 हजार 216 कोटी रुपयांच्या या रेल्वे प्रकल्पात अवघ्या 26 दिवसांत शिवपुरी ते बियासी दरम्यान एक किलोमीटरचा बोगदा बांधून नवा विक्रम रचला गेला आहे. 

Updated: Apr 21, 2022, 09:57 AM IST
देशात विक्रम : केवळ 26 दिवसांत डोंगर पोखरुन रेल्वेचा बोगदा तयार  title=

मुंबई : Indian Railway: उत्तराखंडमधील ऋषिकेश ते कर्णप्रयाग या रेल्वे मार्गाच्या कामाचा वेग वाढला आहे. 16 हजार 216 कोटी रुपयांच्या या रेल्वे प्रकल्पात अवघ्या 26 दिवसांत शिवपुरी ते बियासी दरम्यान एक किलोमीटरचा बोगदा बांधून नवा विक्रम रचला गेला आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रेल्वे विकास मंडळासोबत या प्रकल्पावर काम करणाऱ्या देशातील नामांकित कंपनी L&T चे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली, RVNL पॅकेज-2 अंतर्गत ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे मार्गाचे काम, L&T टीमने कठीण भौगोलिक परिस्थिती असतानाही अवघ्या 26 दिवसांत पूर्णत्वाला नेले. शिवपुरी ते बियासी दरम्यान 1,012 मीटर  NATM (न्यू आस्ट्रियन टनलिंग मेथड) पूर्ण केले. बोगदा पूर्ण करुन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या मोठ्या कामगिरीबद्दल सर्व टीम सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा.

उत्तराखंडमधील रेल्वे प्रकल्प-2 मध्ये 12 नवीन रेल्वे स्थानके आणि 17 नवीन बोगदे बांधले जाणार आहेत. त्यापैकी 8 मीटर व्यासाचे 11 बोगदे सहा किलोमीटरहून अधिक लांबीचे आहेत. या बोगद्यांमध्ये 6 मीटर व्यासाचे बाहेर पडण्याचे बोगदे देखील समाविष्ट आहेत. या प्रकल्पात आतापर्यंत 35 किमीहून अधिक बोगदे बांधण्यात आले आहेत.

25 किमी लांबीच्या प्रकल्पांतर्गत देवप्रयाग, टिहरी गढवाल आणि कर्णप्रयाग जोडले जाणार आहे. यामध्ये 100 किमीचा रेल्वे मार्ग बोगद्यांमध्ये असेल. दुसरीकडे विकासाचा वेग वाढवत केंद्र सरकारने यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम म्हणजेच चारधाम यात्रेला रेल्वे मार्गाने जोडण्याचे कामही सुरु केले आहे. येत्या काही दिवसांत प्रवाशांनाही रेल्वेने देवभूमीपर्यंत पोहोचता येणार आहे.