कर्नाटक निवडणुकीत मठ, मंदिरांना 'राजकीय' भाव!

कर्नाटक दौऱ्यामध्ये राहुल गांधींचं टेम्पल रन सुरूच आहे. आज त्यांनी धर्मशाला इथल्या मंजुनाथेश्वर मंदिराला भेट दिली... गुजरात निवडणुकीत राहुल यांच्या मंदिर भेटींमुळे काँग्रेसला चांगली मदत झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती कर्नाटकातही होण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे.. दुसरीकडे भाजपा अध्यक्ष अमित शाहदेखील आजपासून कर्नाटकच्या दौऱ्यावर आलेत... त्यांनी कोप्पल इथल्या लिंगायत मठाला भेट दिली... काँग्रेसनं लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवलाय... त्यामुळे भाजपानंही लिंगायतांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 

Updated: Apr 28, 2018, 06:24 AM IST
कर्नाटक निवडणुकीत मठ, मंदिरांना 'राजकीय' भाव! title=

धर्मशाला, कर्नाटक : कर्नाटक दौऱ्यामध्ये राहुल गांधींचं टेम्पल रन सुरूच आहे. आज त्यांनी धर्मशाला इथल्या मंजुनाथेश्वर मंदिराला भेट दिली... गुजरात निवडणुकीत राहुल यांच्या मंदिर भेटींमुळे काँग्रेसला चांगली मदत झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती कर्नाटकातही होण्याची काँग्रेसला अपेक्षा आहे.. दुसरीकडे भाजपा अध्यक्ष अमित शाहदेखील आजपासून कर्नाटकच्या दौऱ्यावर आलेत... त्यांनी कोप्पल इथल्या लिंगायत मठाला भेट दिली... काँग्रेसनं लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव पाठवलाय... त्यामुळे भाजपानंही लिंगायतांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू केलाय. 

कर्नाटक विधानसभा निवडणूक धर्म आणि जात या मुद्यांभोवती येवून पोहोचली आहे. त्यामुळे भाजपा आणि काँग्रेसचे दिग्गज नेते मठ, मंदिरांना मोठ्या प्रमाणात भेटी देत असल्याचे चित्र कर्नाटकमध्ये पहायला मिळतंय..कर्नाटक सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर लिंगायत समाजाला अल्पसंख्याक धर्माची मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजकीय समिकरणं बदलली आहेत. 

काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध 

दरम्यान,  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आज कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. कर्नाटकच्या जनतेला गेल्या निवडणूकीत दिलेली 95 टक्के आश्वासनं पूर्ण केल्याचा दावा यावेळी राहुल गांधींनी केला. पुन्हा सत्तेवर आल्यावर हा दर 100 टक्क्यांवर नेण्याचा निर्धारही यावेळी राहुल गांधींनी व्यक्त केला.

राहुल गांधींचा अपघात टळला

कर्नाटकमध्ये सध्या प्रचाराच्या रणधुमाळी राहुल गांधींच्या विमानाचा अपघात होता होता टळलाय. याप्रकरणी काँग्रेसनं चौकशीची मागणी केलीय. गुरुवारी राहुल गांधी एका विशेष विमानानं दिल्लीहून हुबळीला पोहचलं. विमान जमिनीवर उतरत असताना त्यात तांत्रिक बिघाड निर्माण झाला. पण हा तांत्रिक बिघाड नसून त्यामागे घातपाताची शंका काँग्रेसनं व्यक्त केलीय. 

या प्रकरणी डीजीसीए मार्फत चौकशी व्हावी यासाठी पायलट विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय, राहुल गांधींबरोबर विशेष विमानात प्रवास करणारा विद्यार्थ्यांनंही कर्नाटक पोलीस महासंचालकांकडे आणि महा निरिक्षकांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केलीय.  विद्यार्थ्यानं दिलेल्या तक्रारीत विमान उतरतेवेळी हवामान स्वच्छ होतं. याप्रकरणी डीजीसीएनं चौकशीचे आदेश दिले आहेत.