या परदेशी युवतीने ट्विट केला राहुल गांधीसोबतचा खास फोटो

'राहुल गांधी हे उत्तम वक्ता असून त्यांची भेट घेऊन मला खूपच आनंद झाला' अशा आशयाचे ट्विट करून एका युवतीने ट्विटरवर राहुल गांधीसोबतचा फोटो शेअर केला.

Updated: Sep 21, 2017, 08:45 PM IST
या परदेशी युवतीने ट्विट केला राहुल गांधीसोबतचा खास फोटो  title=

मुंबई  : 'राहुल गांधी हे उत्तम वक्ता असून त्यांची भेट घेऊन मला खूपच आनंद झाला' अशा आशयाचे ट्विट करून एका युवतीने ट्विटरवर राहुल गांधीसोबतचा फोटो शेअर केला.

राहुल गांधीबरोबरची ही युवती नेमकी कोण? असा प्रश्न अनेकांच्या मनात डोकावला. 

तुमच्याही मनात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर आहे नथालिया रामोस.राहूल गांधींसोबतचा फोटो शेअर करणारी युवती नथालिया आहे. ही स्पॅनिश अभिनेत्री आहे. नथालियाची आई ऑस्ट्रेलियन आहे तर वडील कार्लोस रामोस हे एक स्पॅनिश पॉप गायक आहेत. नथालिया सध्या अमेरिकेत राहते. 

राहुल गांधीच्या भेटीनंतर तिने ट्विटकरून त्यांच्या भेटीची माहिती दिली तसेच काही फोटो नथालियाने इंस्टाग्रामवरही शेअर केले आहेत. 

राहुल गांधीचं सोशल मीडियातून असं कौतुक करणारी ही युवती हॉलिवूडची अभिनेत्री असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या फोटोशी निगडीत तर्क वितर्कांनाही आता पूर्णविराम मिळाला आहे.