केरळ नन बलात्कार, साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू

फादर कुराईकोस याप्रकरणी न्यायालयाच महत्त्वाची साक्ष देणार होते. 

Updated: Oct 22, 2018, 04:45 PM IST
केरळ नन बलात्कार, साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू  title=

केरळ : केरळात नन बलात्कारप्रकरणातले मुख्य साक्षीदार पंजाबच्या होशियारपूरमध्ये मृतावस्थेत आढळले आहेत. फादर कुराईकोस नावाचे हे धर्मगुरू होशियारपूरमध्ये मृतावस्थेत आढळले. केरळमध्ये ननवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती.फादर कुराईकोस याप्रकरणी न्यायालयाच महत्त्वाची साक्ष देणार होते.

संशयास्पद मृत्यू 

माध्यमांतून ही घटना समोर आल्यानंतर देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या.

शेठपाल चर्चमध्ये ते राहायचे. ते 62 वर्षाचे होते. राहत्या जागेवर ते मृतावस्थेत आढळले.

तिथून महत्त्वाची माहिती मिळविण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे होशियारपूर पोलिसांनी सांगितली.