PM Surya Ghar Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना 300 युनिटपर्यंत मोफत वीजेचा लाभ घेता यावा यासाठी सर्वोदय योजना राबवण्यात आली आहे. या योजनेमुळं फक्त मोफत वीजच नव्हे तर कमाईची संधीदेखील मिळणार आहेत. या योजनेअंतर्गंत रोजगारदेखील मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 75000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक या योजनेत केली आहे.
22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांना 300 युनिट मोफत वीज मिळेल, अशी घोषणा केली होती. ही योजना आता PM Surya Ghar Yojna: मोफत वीज योजना या नावाने लाँच केली जाणार आहे. या योजनेअंतर्गंत लोकांच्या घरावर सोलर पॅनल लावण्यात येणार आहे. ज्यामुळं लोकांना 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळणार आहे. त्याचबरोबर यातून मिळणारी अतिरिक्त वीजेची विक्री करुन वर्षाला 17 ते 18 हजार रुपयांपर्यंतची कमाई करु शकता.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पोस्ट शेअर केला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे की, सतत विकास आणि लोकांच्या भल्यासाठी आम्ही पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेची सुरुवात करत आहे. 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक असलेल्या या योजनेचे लक्ष्य आहे की 1 कोटी कुटुंबीयांना दरमहिना 300 युनिट वीज मोफत मिळेल.
PM मोफत वीज योजनेअंतर्गंत लोकांच्या बँक अकाउंटमध्ये सबसिडी पाठवण्यात येईल. त्याचबरोबर बँकेकडून कर्जदेखील काढून देण्यात येईल. सर्वसामान्य लोकांवर याचा अधिक भार पडणार नाही, याची काळजी केंद्र सरकारकडून घेण्यात येईल. सर्व लाभदारकांना एका राष्ट्रीय ऑनलाइन पोर्टलमध्ये रजिस्टर करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे की, योजनेतून कमाईचीही संधी मिळेल. जेणेकरुन स्थानिक लोकांना सोलर पॅनेलसाठी जास्त प्रोत्साहन देण्यात येईल. तसंच, या योजनेतून कमी वीज बिल आणि कमाई व रोजगाराची संधी निर्माण होईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौरउर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी खासकरुन युवकांना अवाहन केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी https://pmsuryaghar.gov.in वर अप्लाय करावे लागणार आहे. या वेबसाइटवर जाऊन रुफटॉप सोलरवर क्लिक करुन अप्लाय करु शकता. तर, येथेच क्लिक करुन सबसिडी आणि घरावर सोलर पॅनेल कसं लावू शकता याची पूर्ण माहिती मिळवू शकता. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी तर सगळ्यात पहिले https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration वर क्लिक करुन रजिस्ट्रेशन करा. तिथेच तुम्ही कॅलक्युलेट करु शकता की तुम्हाला सब्सिडी किती मिळु शकते. यात ग्राहकांना सांगावं लागते की तुम्ही महिन्याला किती वीज बिल भरता.