पोपट पिटेकर, मुंबई : ग्रामीण भागासह शहरी भागात बाजरीच्या (Bajra) भाकरीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बाजरीची भाकरी (Bajra Bhakri) आणि पिठलं म्हटलं की अनेकांच्या तोंडाला आपोआप पाणी येत. अनेक हॉटेलमध्ये बाजरीची भाकर आणि पिठलं हे प्रसिध्द मेनू असून अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात याला मागणी देखील आहे. बाजरीचं पिक घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता लवकरच अच्छे दिन येणार आहे.
अन्न संकट ही जगासमोर मोठी समस्या बनली आहे. आता या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपाय सुचवला आहे. पंतप्रधानांनी जगभरात बाजरीच्या लागवडीला आणि वापराला चालना देणार असल्याचं सांगितलं आहे. त्यासाठी त्यांनी मिलेट्स फूड्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्याचा प्रस्तावही ठेवला आहे.
भारतात बाजरीचे किती उत्पादन (millet production in India)
बाजरीचे उत्पादन भारतात दरवर्षी 170 लाख टन पेक्षा जास्त होते. बाजरीचे 131 देशांमध्ये त्याची लागवड केली जाते. आशिया आणि आफ्रिकेतील सुमारे 600 दशलक्ष लोक हे त्यांचे पारंपारिक अन्न मानतात. आशियातील सुमारे 80 टक्के बाजरी भारतातील आहे. उत्पादन जास्त असल्यामुळे मोदींनी बाजरी बाबत मोठी घोषणा शिखर परिषदेत केली.
शिखर परिषदेत मोदींची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) उझबेकिस्तानमधील शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत शुक्रवारी उपस्थित होते. त्या SCO शिखर परिषदेत मोदींनी अन्न संकटावर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवल्या. पीएम मोदींच्या मते, बाजरी किंवा बाजरीच्या लागवडीला आणि वापराला प्रोत्साहन देणे गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले. तसेच नागरिकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक उत्तम उपाय असल्याचही मोदी म्हणाले.
मिलेट्स फूड्स फेस्टिव्हलवर भर (Millets Foods Festival)
बाजरी हे एक सुपरफूड आहे. जे हजारो वर्षांपासून केवळ SCO देशांमध्येच नाही, तर जगाच्या मोठ्या भागांमध्ये पिकवले जात आहे. मोदींच्या मते अन्न संकटाचा सामना करण्यासाठी बाजरी हा एक पारंपारिक, पौष्टिक आणि कमी किमतीचा पर्याय आहे. 2023 हे वर्ष UN आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून साजरे केले जाईल, असे मोदी म्हणाले. अशा परिस्थितीत SCO अंतर्गत मिलेट्स फूड्स फेस्टिव्हलचे आयोजन करणं गरजेचं असल्याचं मोदी म्हणाले.
बाजरी सुपरफूड का आहे?
बाजरी हे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. हे कॅल्शियम, जस्त आणि लोहाची कमतरता दूर करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते ग्लूटेन-मुक्त आहे. हृदयविकारांवरही हे फायदेशीर आहे. याशिवाय बाजरी ही उर्जेचा चांगला स्रोत आहे. त्याचे सेवन केल्याने तुमच्या आत ऊर्जा राहते. यामुळेच बाजरीला सुपरफूड असेही म्हणतात.
बाजरी लागवडीसाठी माती
बाजरीच्या लागवडीला जास्त पाणी लागत नाही. ते उच्च तापमानात सहज वाढतात. त्याचे उत्पादन इतर पिकांच्या तुलनेत सोपे असते आणि त्याच बरोबर किडे आणि माइट्समुळे होणाऱ्या रोगांपासूनही त्यांचे संरक्षण होते. त्याची लागवड चांगल्या पाण्याचा निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीसाठी योग्य ठरते. जमिनीचे पीएच मूल्य 6.5 ते 7.5 दरम्यान असावे. बाजरीची लागवड कोणत्याही मातीत करु शकतो.
लागवड कधी करावी
बाजरीची लागवड हे पावसाळा सुरू झाल्यावर केली जाते. मात्र, अनेक राज्यांत त्याची लागवड मार्च-एप्रिलमध्येही केली जाते. पीक लावण्यासाठी खोल नांगरणी करणं गरजेचं आहे.
पेरणीची पद्धत
बाजरी पेरणीसाठी दोन पद्धती आहेत. पहिल्या पद्धतीत शेतकरी बाजरीचे बियाणे शेतात शिंपडतात आणि हलकी नांगरणी केल्यानंतर ते जमिनीत मिसळतात. दुसरीकडे, इतर मार्गाने, शेतकरी बियाणे 2 ते 3 सेंटीमीटर खोल जाईल अशा प्रकारे शेतात बियाणे फवारणी करून खोल नांगरणी करतात. पेरणीनंतर शेतक-यांनी पिकाला वेळोवेळी पाणी देत राहावे. मात्र, या काळात शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित असावा हे लक्षात ठेवा.
कापणी कधी करावी
बाजरीचे पीक तयार होण्यासाठी 75 ते 85 दिवस लागतात. बाजरीचे दाणे कडक होऊन तपकिरी दिसू लागल्यावर पीक काढावे. एक हेक्टरमध्ये बाजरीची लागवड केल्यास 25 ते 30 क्विंटल धान्याचे उत्पादन मिळून चांगला नफा मिळू शकतो.