आता फक्त आधार कार्ड नंबरवरुन तपासा तुमचा बँक बॅलन्स; फॉलो करा या सोप्या टिप्स

बॅंक अकाऊंट नंबर न सांगताही तपासता येणार बँक बॅलन्स

Updated: Sep 19, 2022, 10:03 PM IST
आता फक्त आधार कार्ड नंबरवरुन तपासा तुमचा बँक बॅलन्स; फॉलो करा या सोप्या टिप्स title=

सध्या आधार कार्ड (aadhar card) हे आपल्या ओळख पत्रांपैकी सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनलं आहे. तुमचं आधार कार्ड हे तुमचा मोबाईल नंबर, बँक खाते (bank account), पॅन कार्ड (pan card) आणि इतर अनेक कागदपत्रांशी जोडलेलं आहे. आधार कार्ड (aadhar card) हे 12 अंकी युनिक नंबरसह येतो, जो UIDAI द्वारे जारी केला जातो. आधार कार्ड धारकासाठी 12 अंकी क्रमांक खूप महत्त्वाचा आहे. तुमची सर्व वैयक्तिक माहिती त्यात दडलेली असते. 

पण तुम्ही 12 अंकी आधार कार्ड (aadhar card) नंबर वापरून तुमच्या बँक खात्यात (bank account) किती शिल्लक पैसे आहेत हे तपासू शकता. आधारच्या मदतीने अशा काही सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना (Senior citizen) बँकेत जाण्याची गरज भासणार नाही.

तुम्ही इंटरनेट बँकिंगशिवाय (internet banking) तुमच्या खात्यातील (bank account) शिल्लक रक्कम देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत (bank) जाण्याचीही गरज भासणार नाही. यासाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल (Mobile) असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरून आधारच्या मदतीने तुमच्या बँक खात्यात (bank account) जमा केलेल्या रकमेचा तपशील सहज जाणून घेऊ शकता. 

या स्टेस्प करा फॉलो

तुमच्या बँक खात्यात नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून *99*99*1# असं डायल करा. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर व्हेरिफाय करावा लागेल. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर बँक बॅलन्ससह UIDAI कडून मेसेज येईल. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या आधार क्रमांकाच्या मदतीने तुमच्या खात्यात जमा केलेल्या रकमेची माहिती सहज मिळवू शकता.

दरम्यान, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असो, बँकेशी संबंधित कोणतेही काम असो, जवळपास सगळीकडेच आधार कार्डचा वापर होतो. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आधार कार्डची गरज झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) एक मोठी योजना आखली आहे.

याअंतर्गत देशातील मोठ्या शहरांमध्ये शेकडो केंद्रे उघडली जाणार आहेत. UIDAI ने देशातील 53 प्रमुख शहरांमध्ये एकूण 114 आधार सेवा केंद्रे उघडण्याची योजना तयार केली आहे. देशातील सर्व मेट्रो शहरे, सर्व राज्यांच्या राजधानी आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही आधार सेवा केंद्रे उघडली जातील.

नवीन आधार कार्ड बनवायचे असो किंवा त्यात कोणतेही बदल करायचे असोत, तुम्ही या आधार सेवा केंद्रांमधून आठवड्याचे सातही दिवस सेवा घेऊ शकता. सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत हे केंद्र सुरु असते. या आधार सेवा केंद्रांमध्ये वृद्ध आणि दिव्यांगांसाठी विशेष सुविधा पुरविल्या जातात.