Greek Girl Singing Indian Song : ज्याप्रमाणे एखाद्या फुलाला विवक्षित सुगंध असतो, तसंच भारतीय संगीतामध्ये प्रत्येक रागाला एक भाव आहे. आपल्या भारतीय संगीतातील शब्दांत संस्कार, संयम, तपस्या व ध्येय या गोष्टी कशा अंतर्भूत आहेत. त्यामुळेच भारतीय संगीत क्षेत्राला मोठा वारसा लाभल्याचं पहायला मिळतंय. भारतीय संगीताने देखील सिनेसृष्टी अजरामर केली. भारतीय गाण्याचे अनेक चाहते जगभरात आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एका चिमुकलीचा सुंदर व्हिडीओ (Greek Girl Video) शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संध्याकाळी दिग्गज गायक मोहम्मद रफी यांचे "मधुबन में राधिका नाचे रे" हे गाणे गाताना एका लहान ग्रीक मुलीचा व्हिडिओ शेअर (PM Modi Shares Video) केला आहे. ब्रिक्स परिषदेनंतर पंतप्रधान मोदी ग्रीसमध्ये पोहोचले आहेत. ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये पंतप्रधानांचे जोरदार स्वागत करण्यात आलं. ढोल-ताशांसह पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी लोक अथेन्समध्ये दाखल झाले होते. त्यावेळी एका कार्यक्रमानंतर मोदींना एक चिमुकली भेटली. आपल्या परिवारासह ती त्याठिकाणी मोदींना भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने मोदींना सुरेख आवाजात भारतीय गाणं म्हणून दाखवलं.
आणखी वाचा - ISRO ने विक्रम लँडरची 'ती' पोस्ट डिलीट का केली? सोशल मीडियावर संभ्रमाचं वातावरण!
नरेंद्र मोदींना गाणं इतकं आवडलं की, त्यांनी तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'कॉन्स्टँटिनोस कलैटिसचे (Konstantinos Kalaitzis) भारतावर, विशेषत: भारतीय संगीत आणि संस्कृतीवर प्रेम आहे. ही आवड त्यांच्या कुटुंबानेही शेअर केली आहे. हा छोटासा व्हिडिओ त्याची झलक देतो', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स हॅडलरवर म्हटलं आहे.
Konstantinos Kalaitzis loves India, particularly Indian music and culture. This passion is also shared by his family. This small video gives a glimpse of it. pic.twitter.com/hoJARzhjcj
— Narendra Modi (@narendramodi) August 25, 2023
दरम्यान, मोदींच्या स्वागतसाठी भारतीय वंशाच्या लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर मोजींनी ग्रीसमधील भारतीयांना संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी चांद्रयान-3 ची यशोगाथा सांगितली. त्यानंतर त्यांनी काशी ते अथेन्स यांच्याची नात्याविषयी भाष्य केलं. संस्कृतिक जडणघडणीवर त्यांनी भर दिला. त्यानंतर त्यांनी ग्रीसमध्ये राहणाऱ्या भारतीयांना भारताच्या विकासाची प्रत्येक कहाणी देखील सांगितली. त्यांच्या भाषणाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं.