हैदराबाद: विरोधक हे अंधाराप्रमाणे आहेत, आम्ही उजेड आहोत, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टिप्पणीचा एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी समाचार घेतला. ते गुरुवारी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. यावेळी ओवेसींनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी म्हटले की, जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्ती न करून तुम्ही अगोदरच अंधार पसरवला आहे. दिवसेंदिवस पेट्रोल व डिझेलचे दर आणखीनच वाढत आहेत. त्यामुळे परिस्थिती सामान्य माणसाच्या हाताबाहेर जाऊ लागली आहे. या अंधाराची छाया आणखीनच गडद होत चालली आहे, असे ओवेसी यांनी म्हटले.
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने नुकतेच भारत बंद आंदोलन केले होते. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर सरकारकडून पेट्रोल व डिझेलचे दर आमच्या हातात नाहीत, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे विरोधकांनी भाजपविरोधातील टीकेची धार आणखीनच वाढवली होती.
Want to say PM Modi that he has already created enough darkness by ensuring that prices of petrol and diesel go beyond the reach of common man. He has created darkness by not fulfiling promises he made: A Owaisi (AIMIM) on PM's statement, "we are the light,opposition is darkness" pic.twitter.com/iYlDOx5Mv4
— ANI (@ANI) September 13, 2018