एकमेंकावर जोरदार टीका केल्यानंतर भेटले पंतप्रधान मोदी आणि मनमोहन सिंग

गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. परंतु निवडणुकीच्या प्रचाराच्या दोन दिवसानंतर दोघे मोठे नेते पुन्हा एकमेकांना भेटले. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 13, 2017, 04:35 PM IST
एकमेंकावर जोरदार टीका केल्यानंतर भेटले पंतप्रधान मोदी आणि मनमोहन सिंग title=

नवी दिल्ली : गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. परंतु निवडणुकीच्या प्रचाराच्या दोन दिवसानंतर दोघे मोठे नेते पुन्हा एकमेकांना भेटले. 

संसदेवरील हल्ल्याला १६ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहीदांनी श्रद्धांजली देण्यासाठी नरेंद्र मोदी आणि मनमोहन सिंग तेथे जमले होते. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, सुषमा स्वराज, रविशंकर प्रसाद आणि सरकारमधील अनेक नेते उपस्थित होते.

१३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर दहशतवादी हल्ला झाला होता, ज्याला सुरक्षा रक्षकांनी धैर्याने तोंड देत ५ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ज्यामध्ये महिलेसह ८ जवान शहीद झाले होते.

गृहमंत्री राजनाथ सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक मोठे नेते या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र दिसले. निवडणुकीमध्ये एकमेकांवर टीका करणारे अशा गोष्टीसाठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा लोकशाहीची ताकद दिसते.