PM Jan Dhan Yojana: केवळ एका Missed call वर जाणून घ्या, तुमच्या खात्यातील रक्कम...

प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे.

Updated: Oct 7, 2022, 05:51 PM IST
PM Jan Dhan Yojana: केवळ एका Missed call वर जाणून घ्या, तुमच्या खात्यातील रक्कम... title=

PM Jan Dhan Yojana 2022: प्रधानमंत्री जन-धन योजनेच्या (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) लाभार्थ्यांसाठी कामाची बातमी आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत (PMJDY) देशातील गरीबांचे खाते बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये झीरो बॅलेंसमध्ये उघडले जातात. या योजनेअंतर्गत ग्राहकांना अनेक मोठ्या सुविधा दिल्या जातात. जर तुम्हाला तुमच्या खात्याची शिल्लक (Jan Dhan Bank Account) तपासायची असेल, तर तुम्ही घरबसल्या एका मिस कॉलद्वारे (Missed Call) माहिती मिळवू शकता. याबद्दलची सविस्तर जाणून घेऊया...

'अशी' जाणून घ्या शिल्लक रक्कम...

तुमच्या जन धन खात्यातील शिल्लक दोन प्रकारे जाणून घेता येते. यामध्ये पहिला मार्ग म्हणजे मिस्ड कॉलद्वारे आणि दुसरा मार्ग म्हणजे PFMS पोर्टलद्वारे आहे. म्हणजेच, तुम्ही काही मिनिटांत घरबसल्या तुमचं स्टेटस तपासू शकता.

PFMS पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या...

PFMS पोर्टलवरील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी, सर्वात प्रथम https://pfms.nic.in/NewDefaultHome.aspx# या लिंकवर जा.
- दिलेल्या 'Know Your Payment' वर क्लिक करा.
- यानंतर तुमचा अकाऊंट नंबर टाईप करा. (अकाऊंट नंबर दोन वेळा टाईप करावा लागतो.)
- त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड भरा.
- यानंतर तुमच्या खात्यातील शिल्लक रक्कम तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.

मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या...

 जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जन-धन खातं असेल, तर तुम्ही मिस्ड कॉलद्वारे शिल्लक रक्कमेची माहिती घेऊ शकता. यासाठी 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस्ड कॉल करा. खातेदारांची नोंद, तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून त्यावर मिस्ड कॉल करावा लागेल. म्हणजेच, बँकेच्या नियमांनुसार, तुम्ही ज्या क्रमांकावर नोंदणी केली आहे त्याच नंबरवरून तुम्हाला मिस कॉल द्यावा लागेल.