नवी दिल्ली : सुरक्षित आणि शुद्ध म्हणून जे मिनरल वॉटर विकत घेतलं जातं, तेच किती घातक असल्याचं समोर आलंय.
जगभरातल्या आघाडीच्या मिनरल वॉटर अर्थात शुद्ध पाणी देण्याचा दावा करणा-या बाटल्यांमधल्या पाण्यात चक्क प्लॅस्टिकचे कण आढळून आलेत. अमेरिकेमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. बिस्लेरी, अॅक्वाफिना, दसानी, एव्हियन, नेस्ले प्युअर लाईफ अशा अकरा मिनरल वॉटर ब्रँडसचं पाणी तपासण्यात आलं.
त्यापैकी ९० टक्के नमुन्यांमध्ये पाण्यात प्लॅस्टिकचा अंश सापडला. भारतासह ब्राझील, चीन, अमेरिका, इंडोनेशियामधल्या मिनरल वॉटरचे नमुने तपासण्यात आले.