'हे' 5 टॅक्स स्लॅब अर्थव्यवस्थेसाठी घातक

वर्ल्ड बँकेने इंडिया डेव्हलपमेंट अपडेटच्या सहामाई रिपोर्टमध्ये गुड्स एण्ड सर्विस टॅक्स GST बाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत. 

Dakshata Thasale Updated: Mar 16, 2018, 09:06 AM IST
 'हे' 5 टॅक्स स्लॅब अर्थव्यवस्थेसाठी घातक  title=

मुंबई : वर्ल्ड बँकेने इंडिया डेव्हलपमेंट अपडेटच्या सहामाई रिपोर्टमध्ये गुड्स एण्ड सर्विस टॅक्स GST बाबत गंभीर प्रश्न उभे केले आहेत. 

रिपोर्टमध्ये अशी माहिती दिली आहे की, भारतात GST सर्वाधिक आहे. तसेच 115 देशांत भारतात टॅक्स रेट देखील सर्वात जास्त आहे. 1 जुलै 2017 लागू केलेल्या जीएसटीमध्ये अनुक्रमे 0,5,12,18 आणि 28 टक्के इतके आहे. तसेच काही सामान आणि सेवांना GST पासून बाहेर ठेवण्यात आलं आहे. आता पेट्रोलियम उत्पादनाला देखील GST तून वगळण्यात आलं आहे

115 देशांत GST लागू 

रिपोर्टमध्ये सांगितलंय आहे की, संपूर्ण जगात 115 देशांमध्ये GST लागू आहे. 115 देशांत फक्त 5 देशात 5 टॅक्स स्लॅबची व्यवस्था आहे. त्यामध्ये भारत, इटली, लग्जमबर्ग, पाकिस्तान आणि घाना या 5 देशांचा समावेश आहे. 

 अर्थमंत्र्यांनी टॅक्स स्लॅबच्या बदलाबद्दल सांगितलं

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितलं की, टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले जाणार आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, 12 ते 18 टक्के टॅक्स स्लॅबला एकच केलं जाणार आहे. GST लागू करण्याच्या वेळी 28 टक्के स्लॅबमध्ये 228 वस्तू आणि सेवांचा समावेश आहे. मात्र सतत विरोध केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात GST काऊंसिलने अधिकतम टॅक्स स्लॅबच्या वेळी जवळपास 180 वस्तू आणि सेवांना बाहेर काढलं होतं. भविष्यात फक्त 50 वस्तू आणि सेवांमध्ये 28 टक्के टॅक्स लागणार आहे. 

वर्ल्ड बँकेच्या रिपोर्टने काय दिला सल्ला? 

वर्ल्ड बँकेने आपल्या रिपोर्टमध्ये GST च्या नंतर टॅक्स रिफंडच्या मंद गतीवर देखील चिंता व्यक्त केली आहे. येणाऱ्या दिवसांत भारताच्या GST ची स्थिती सुधारण्याची आशा व्यक्त केली गेली आहे. त्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार टॅक्स स्लॅबची संख्या कमी केल्यावर आणि त्यावर कायद्याचा प्रभाव पडल्यास GST आणखी प्रवाभशाली होईल.