Petrol-Diesel च्या किमती जाहीर, तुमच्या शहरांतील आजचे दर काय?

मागील काही दिवसापासून देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र येत्या काही दिवसांत कच्चा तेलाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 17, 2022, 10:33 AM IST
Petrol-Diesel च्या किमती जाहीर, तुमच्या शहरांतील आजचे दर काय?   title=

Petrol Diesel Price Today :  मागील काही दिवसापासून देशातील इंधनाचे दर स्थिर आहेत. मात्र येत्या काही दिवसांत कच्चा तेलाच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज (17 ऑगस्ट) जाहीर केलेल्या दरानुसार पेट्रोल- डिझेलच्या किंमतींमध्ये कोणातेही बदल झाला नाही. 

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com ने जाहीर केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर, राजधानी दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दर आहे. चेन्नईत पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. 

इतर शहरांमध्ये दर काय?

पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 107.98 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे. परभणीत पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. 

 Petrol Diesel चे दर कुठे आणि कसे पाहाल?

- इंडियन ऑईलच  IndianOil ONE Mobile App मोबाईलवर डाऊनलोड करुन, इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

- तसेच इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) पाहता येतील.

- पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) SMS वर देखील कळू शकतील. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).