Petrol-Diesel Price: दिवाळीत पेट्रोल-डिझेलचे दर किती रुपयांनी घसरले? पाहा तुमच्या शहरातील किंमत

Petrol Diesel Prices 23 October Updates:  राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. 23 ऑक्टोबरलाही देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. चला जाणून घेऊया दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील सर्व शहरांमध्ये इंधनाचे आजचे दर काय आहेत?

Updated: Oct 23, 2022, 12:01 PM IST
Petrol-Diesel Price:  दिवाळीत पेट्रोल-डिझेलचे दर किती रुपयांनी घसरले? पाहा तुमच्या शहरातील किंमत title=

Petrol Price Today: दिवाळीच्या मुहूर्तावर तेलाच्या किमतीत जनतेला कोणताही दिलासा मिळालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती अस्थिर आहेत मात्र राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे (petrol-diesel rate) दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी दररोज प्रमाणे 23 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. ज्यामध्ये कोणतेही बदल दिसून आले नाहीत. 

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi Petrol Rate) एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai Petrol rate) पेट्रोलचा दर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय कोलकात्यात पेट्रोलचा दर 92.76 रुपये, तर डिझेलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 102.63 रुपये आणि डिझेलची किंमत 94.24 रुपये प्रति लीटर आहे.

एनसीआरमध्ये तेलाची किंमत (NCR Oil rate)

नोएडामध्ये पेट्रोलचा दर 96.79 रुपये आणि डिझेलचा दर 89.96 रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय गाझियाबादमध्ये पेट्रोल 96.58 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे आणि डिझेलची किंमत 89.75 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. त्याच वेळी, गुरुग्राममध्ये पेट्रोलचा दर 97.18 रुपये आणि डिझेलचा दर 90.05 रुपये प्रति लिटर आहे.

वाचा : ऐन दिवाळीत सोने-चांदी खरेदीचा विचार असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी; जाणून घ्या आजचा भाव 

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट (petrol price update)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बऱ्याच दिवसांपासून कायम आहेत.

वाचा : IND vs PAK सामन्यातील 'या' 5 खेळाडूंमध्ये कोण ठरणार lucky charm?

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत SMS द्वारे तपासा

राज्यस्तरीय करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.