India vs Pakistan, T20 World Cup 2022: टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2022) मध्ये भारतीय संघ आज (23 ऑक्टोबर) दुपारी 1.30 वाजता मेलबर्न येथे पाकिस्तान विरुद्ध हाय व्होल्टेज सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी माजी भारतीय खेळाडू अनिल कुंबळेने मोठे वक्तव्य केले. या सामन्यात स्टार गोलंदाज मोहम्मद शमी खेळताना दिसणार नाही, असा विश्वास अनिल कुंबळेने व्यक्त केला आहे. (IND vs PAK Live streaming)
अनिल कुंबळेचे धक्कादायक विधान
जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जागी T20 विश्वचषकात मोहम्मद शमीला घेण्यात आले आहे. दरम्यान अनिल कुंबळेने (Anil Kumble) ईएसपीएन क्रिकइन्फोवरील चर्चेदरम्यान सांगितले की, 'हर्षल पटेल (Harshal Patel) हा विश्वचषक स्पर्धेपर्यंतील गोलंदाजीचा एक भाग आहे. तो मधल्या षटकांपासून शेवटच्या षटकांपर्यंत गोलंदाजी करतो. त्यामुळे मला वाटते की संघ त्याच्यासोबत असेल. खरं आहे, मोहम्मद शमीने (Mohammed Shami) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात एका षटकात जे काही करायचे होते ते केले.
पण तो गेल्या काही काळापासून नवीन चेंडूवर वर्चस्व गाजवत आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) अनुपस्थिती भारतासाठी चिंतेची बाब होती. पण बुमराहला संघात कमी पडू देणार नाही हे मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले आहे.
वाचा : IND vs PAK मॅचवर महासंकट, असं झाल्यास फॅन्सच्या पदरी निराशा
सराव सामन्यात गदारोळ झाला
मोहम्मद शमीने (Mohammed Shami) अलीकडेच शानदार गोलंदाजी केली होती. ब्रिस्बेनच्या गाबा (Brisbane's Gaba) मैदानावर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2022 सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती. परंतु टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने केवळ 4 धावा दिल्या आणि 3 बळी घेतले. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाचा एक खेळाडू धावबाद झाला.
गेल्या वर्षी शेवटचा अधिकृत T20 सामना खेळला
मोहम्मद शमी (Mohammed Shami) गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात संघाचा भाग होता. या टी-20 विश्वचषकात त्याची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. मोहम्मद शमीने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकात नामिबियाविरुद्ध शेवटचा टी 20 सामना खेळला होता. मोहम्मद शमी 2021 च्या टी-20 विश्वचषकापासून टी-20 संघाबाहेर होता. शमीने भारतासाठी आतापर्यंत एकूण 17 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 9.55 च्या इकॉनॉमीने केवळ 18 विकेट्स घेतल्या आहेत.