Petrol-Diesel Price : क्रूड ऑइल महागल्यानंतर तेल कंपन्यांकडून मोठा निर्णय, आजचे पेट्रोल-डिझेलचा दर

ऑगस्ट महिन्यात स्वस्त होणार पेट्रोल डिझेल?   

Updated: Jul 31, 2021, 08:20 AM IST
Petrol-Diesel Price : क्रूड ऑइल महागल्यानंतर तेल कंपन्यांकडून मोठा निर्णय, आजचे पेट्रोल-डिझेलचा दर  title=

मुंबई : महिन्याच्या शेवटच्या तारखेला पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज 31 जुलै 2021 रोजी सलग 14 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात काहीच बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत वाढ झाली आहे. या महिन्याची सुरूवात वैश्विक बाजारात कच्चा तेलाच्या भावात घसरण झाल्यानंतर इंधनाच्या वाढत्या दराला ब्रेक मिळाला आहे. (Petrol Diesel Price 31st July 2021 : Check New Rates in Mumbai, Delhi, Kolkata, ) 

इंधनाच्या दरात बदल झाल्यानंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 101.83 रुपये आणि मायानगरी मुंबईत 107.83 रुपये प्रती लीटर आहे. कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोटलचा दर क्रमशः 102.08 रुपये आणि 102.49 रुपये प्रती लीटर आहे. देशभरातील 25 ते 20 शहरात पेट्रोलचा दर 100 रुपये प्रती लीटर आहे. पेट्रोलच नाही तर डिझेलच्या दराने देखील रेकॉर्ड स्तर गाठला आहे. राजधानी दिल्लीत डिझेलचा दर 89.87 रुपये प्रती लीटर आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसह अनेक शहरात डिझेलचा दर 90 रुपये प्रती लीटर आहे. 

ऑगस्ट महिन्यात स्वस्त होणार पेट्रोल डिझेल? 

कच्चा तेलाच्या दरात वाढ होत असताना लवकरच दर कमी होती अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीला इंधनाच्या दरात घसरण होईल असं तज्ज्ञांचं मत होतं. मात्र कच्चा तेलात घसरण पाहायला मिळाली. मात्र पुढील काही आठवड्यात हा ट्रेंड बदलणार आहे. 

देशात सर्वत्र पेट्रोल-डिझेलचे दर कमी का आहेत?

विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इंधनाच्या किंमतींमधील हा फरक कर आणि वाहतुकीमुळे आहे. याशिवाय, केंद्र सरकार इंधनाच्या किंमतीवर उत्पादन शुल्क देखील आकारते. देशभरातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अनुप्पूर येथे विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल 113.21 रुपये आणि डिझेल 103.15 रुपये दराने उपलब्ध आहे. त्याचवेळी, अनुपपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.78 रुपये आणि डिझेलची किंमत 101.15 रुपये प्रति लीटर आहे.