Today Petrol Diesel price : सणासुदीच्या काळात बाहेर फिरणं किंवा घरात सामान आणण्यासाठी बाहेर जाणं होतं. त्यामुळे गाडीचा वापर खूप होतो. आता तुम्ही टाकी फुल्ल करण्याआधी एकदा आजचे दर काय आहेत ते नक्की तपासा. आणि दर कसे पाहायचे याबाबत जाणून घेऊया. दरम्यान गेल्या आठवड्यापासून कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. गेल्या एका आठवड्यात सुमारे $6 ची वाढ नोंदवली गेली आहे. कच्च्या तेलाच्या किमती अवघ्या 5 दिवसांत $91.70 वरून $98.45 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. (petrol diesel latest price updates today 9 oct 2022 sc)
दोन महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली होती. मात्र देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आता जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलची किंमत किती आहे ते जाणून घ्या...
कच्च्या तेलाचा दर
7 ऑक्टोबर रोजी ब्रेंट क्रूड $ 90 च्या वर चढून $ 98.45 प्रति बॅरलवर पोहोचले. आर्थिक घडामोडी वाढू लागल्याने आणि सणासुदीचा हंगाम जवळ आल्याने मागणी वाढली आहे. याच कारणामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मोठी उसळी आली. पेट्रोलियम उद्योगाच्या अंतरिम आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये पेट्रोलची विक्री 13.2 टक्क्यांनी वाढून 2.65 दशलक्ष टन झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 2.34 दशलक्ष टन होती.
शहर आणि तेलाच्या किमती (Petrol-Diesel Price on 9th october)
- दिल्ली पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
- मुंबई पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर
- कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
- तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लिटर
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लिटर
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
- भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लिटर
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर
- पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर