कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे!

Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमती आज किचिंत वाढ  झाली आहे. मात्र आज देशात कुठेही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर...

श्वेता चव्हाण | Updated: Apr 22, 2023, 07:59 AM IST
कच्चा तेलाच्या किमतीत वाढ, अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे!  title=
Petrol-Diesel Price on 22 April 2023

Petrol-Diesel Price on 22 April 2023 : गेल्या काही दिवसाच्या नरमाईनंतर कच्चा तेलाच्या किमतीत (crude oil prices) पुन्हा एकदा उसळीने व्यवसाय होताना दिसत आहे. आज सकाळी जारी झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किरकोळ किमतींवरही त्याचा परिणाम दिसून आला असून काही शहरांमध्ये वाहन इंधनाच्या किरकोळ वाढल्या आहेत. आज ब्रेंट क्रूड 0.69 टक्के किंवा $ 0.56 च्या वाढीसह 81.66 वर विकले जाणार आहे. दरम्यान सरकारी तेल विपणन कंपन्या देशभरात दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर करतात. महागडी एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट झाली असती. परिणामी सर्वसामान्यांना त्यांच्या वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात.   

दरम्यान दिल्लीला लागून असलेल्या एनसीआर भागात अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ नोंदवली गेलीय. त्यानुसार दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये तर डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरने आजचे दर असणार आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये, डिझेल 94.33 रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे. 

वाचा : अक्षय्य तृतीया 'या' शुभ योगात, पंचांगनुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाल 

या शहरात पेट्रोल महाग

देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. यामध्ये गुजरातमध्ये पेट्रोल आणि डिझेल 27 पैशांनी वाढले असून ते पेट्रोल 96.49 रुपये आणि 92.23 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याचप्रमाणे हरियाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 28 पैशांनी वाढ होऊन पेट्रोल 97.52 रुपये आणि डिझेल 90.36 रुपये प्रति लीटर आहे. 

महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात घसरण

महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरात सुमारे 89 पैशांची घसरण झाली आहे. मात्र, तरीही येथे पेट्रोलचा दर 105.96 रुपये प्रतिलिटर आहे. पंजाबमध्येही पेट्रोल 29 पैशांनी स्वस्त झाले आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 पैशांची घसरण झाली आहे. आज चेन्नई या महानगरातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

चारही महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
  • मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.26 रुपये प्रति लिटर
  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

घरबसल्या चेक करा नवे  दर 

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात.  त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.