भारतीय पत्रकारांच्या मदतीने पाकिस्तान आपली प्रतिमा सुधारणार? चीन करणार फंडिंग

पाकिस्तान आपली प्रतिमा बदलण्याच्या जोरदार प्रयत्नात 

Updated: Jun 19, 2021, 07:30 AM IST
भारतीय पत्रकारांच्या मदतीने पाकिस्तान आपली प्रतिमा सुधारणार? चीन करणार फंडिंग  title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याबाबत विश्वास गमावल्यानंतर पाकिस्तान आता मीडियाची मदत घेत आहे. आपली प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तान आणि चीन एकत्र येऊन एक मीडिया हाऊस बनवण्याच्या तयारीत आहेत. (Pakistan Trying to Improve its Image with the help of Indian Journalists Evidence held by Intelligence agencies ) ज्यामुळे हे दोघं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करणार आहेत. एवढंच नव्हे तर या माध्यमातून भारता विरोधात दुष्टचक्र करण्याचा विचार आहे. 

पाकिस्तान आणि चीनच्या आगामी सैनिक बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की, या प्रोजेक्ट करता अनेक भारतीय पत्रकार आणि लेखकांशी पाकिस्तानची एजन्सी संपर्कात आहे. त्यांना आपल्यासोबत काम करण्यासाठी तयार केलं जात आहे. 

दहशतवादी म्हणून ओळखले जातात पाकिस्तानी

भारतीय गुप्त एजन्सीला पाकिस्तानच्या सेनेचे एक महत्वाचे दस्तावेज सापडले आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'पाकिस्तानला आपल्या आंतरराष्ट्रीय मलिन प्रतिमेमुळे खूप नुकसान सहन करावं लागलं आहे. पाकिस्तानातील सगळ्या नागरिकांना संपूर्ण जगभरात दहशवादी म्हणूनच पाहिलं जातं. कायमच पाकिस्तानच्या नागरिकांची एअरपोर्टवर कडक तपासणी आणि चौकशी केली जाते. एवढंच नव्हे तर अनेक देशात पाकिस्तानच्या नागरिकांना विझा देणे पू्र्णपणे बंद केले आहे. पाकिस्तानच्या पासपोर्टला अतिशय संशयाने पाहिलं जातं.'

ही संपूर्ण प्रतिमा बदलण्यासाठी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एक मीडिया कम्पेन चालवत आहेत. महत्वाचं म्हणजे याकरता लागणारा सगळा फंड चीन पुरवणार आहे. पाकिस्तान यासाठी किती उत्सुक आहे हे आपल्याला पाकिस्तानच्या हालचालींवरून कळतच असेल. गेल्या वर्षापासून पाकिस्तान तुर्कीच्या संपर्कात असून आंतरराष्ट्रीय चॅनल तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र हा प्रोजेक्ट अद्याप सुरू झालेलं नाही.

चीन करणार या संपूर्ण प्रोजेक्ट करता फंडिंग 

पाकिस्तान सेनेच्या दस्तावेजवरून मिळालेल्या माहितीनुसार, हे चॅनल अल-जजीरा आणि रशिया टुडे यांच्यावर आधारित आहे. सध्या या प्रोजेक्टमध्ये चीनची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बदलण्याच्या प्रोजेक्टबद्दल उल्लेख केलेला नाही. मात्र प्रोजेक्टकरता फंड देण्याकरता चीनचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणजे या मीडिया हाऊसचा वापर चीनला देखील करायचं आहे हे उघड आहे. 

कोरोना संक्रमणानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची प्रतिमा खूप भीतीदायक आहे. नुकतीच चीनच्या ब्यूरो मीटिंगमध्ये चीनच्या राष्ट्रपतींनी स्विकारलं आहे की,'त्यांच्या कटू नितीमुळे इतर देशांवर केलेले आक्रमक आरोपांचा उल्टा परिणाम होत असतो.'

सोशल मीडियावर देखील कॅम्पेन चालणार 

या मीडिया हाऊसमध्ये टीव्ही चॅनलसोबतच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा देखील पाकिस्तान आधार घेणार आहे. भारताला कमकुवत करण्यासाठी मोठं कॅम्पेन चालवलं जाणार आहे. या कामाकरता आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकार आणि लेखक जोडण्याची कवायत सुरू आहे. यामध्ये महत्वाची माहिती म्हणजे भारत आणि परदेशात राहणारे भारतीय लेखक, पत्रकार या प्रोजेक्टमध्ये रस घेत आहेत.  

समर्थन आणि पैसा मिळवण्याकरता बनवला प्लान

पाकिस्तान बऱ्याच काळापासून स्वतःला इस्लामकरता लढणारा देश म्हणून मुस्लिम देशांकडून पैसे घेत आहे. मात्र चीनमधील उइगर मुसलमानांच्या सामूहिक त्रासाबद्दल पाकिस्तानने कधीच तोंड उघडलं नाही. या देशांमध्ये भारतीय डिप्लोमेसी यशस्वी होत आहे. तेथे भारताचा प्रभाव वाढत आहे. भारताला मुसलमानांवर अत्याचार करणारा देश म्हणून सादर करण्याची पाकिस्तानची कल्पना आता काम करत नाही. यामुळे मुस्लिम देशांमधून पाकिस्तानला मिळणारं समर्थन आणि पैसा दोन्ही कमी झालं आहे. 

भारतीय पत्रकार देखील कॅम्पेनमध्ये होणार सहभागी 

अफगाणिस्तानमधून निघाल्यानंतर अमेरिकेला देखील पाकिस्तानची तेवढी गरज राहिलेली नाही. अमेरिका अगोदर चीनसोबत पाकिस्तानची तडजोड आणि दहशतवाद यामुळे पाकिस्तानावर नाराज आहे. यामुळे पाकिस्तान आपली प्रतिमा बदलण्याच्या पूर्ण तयारीत आहे.