Sania Mirza: आपलं मूल गोरं असावं यासाठी सानियाने... शोएब मलिकचा मोठा खुलासा

जन्माला येणारं मूल गोरं असावं यासाठी सानिया मिर्झा... शोएबने सांगितला त्यावेळचा किस्सा

Updated: Apr 11, 2022, 12:36 PM IST
Sania Mirza: आपलं मूल गोरं असावं यासाठी सानियाने... शोएब मलिकचा मोठा खुलासा title=

Sania Mirza : पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik) पत्नी सानिया मिर्झाबद्दल (Sania Mirza) मोठा खुलासा केला आहे. त्याची पत्नी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने गरोदरपणात भरपूर सफरचंद खाली असं शोएबने म्हटलं आहे. जन्माला येणारं मूल गोरं व्हावं यासाठी सानियाची आी तिला सफरदचंद खायला द्यायची असं शोएबने एका मुलाखतीत सांगितलं.

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएबचं  2010 मध्ये लग्न झालं.  2018 मध्ये सानिया आणि शोएबला मुलगा झाला. त्याचं नाव इझान असं ठेवण्यात आलं आहे.

एका पाकिस्तानी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत शोएब मलिकने सानिया आणि आपल्या मुलाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. माझ्या सासूबाईंनी माझ्या पत्नीला भरपूर सफरचंद खायला दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार सफरचंद खाल्याने मूलं गोरी होतात, असं शोएबने आपल्या मुलाखतीत सांगितलं 

मलिकने सानियासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्साही सांगितला. जेव्हा मी सानियाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिने मला भावही दिला नाही. त्यानंतर जेव्हा मी तिला भेटलो तेव्हा ती माझ्याशी बोलली. दोघे 2003 मध्ये पहिल्यांदा भेटले होते.

2009मध्ये भेटीगाठी वाढल्या
याआधी सानिया मिर्झाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की 2003 नंतर जवळपास सहा वर्षांनी म्हणजे 2009 मध्ये दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. ऑस्ट्रेलियातील होबार्टमध्ये दोघांची भेट झाली. दोघांमध्ये संवाद झाला. त्यानंतर ते सतत एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर 2010 मध्ये सानिया आणि मलिकचे लग्न झालं.

सानियाने 2009 मध्ये तिचा मित्र सोहराबसोबत एंगेजमेंट केली होती, पण काही वेळातच तिचा ब्रेकअप झाला. सोहराबनंतर मलिक तिच्या आयुष्यात आला आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम सुरू झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. आठ वर्षांनंतर सानिया गरोदर राहिली. ऑक्टोबर 2018 मध्ये तिने इझानला जन्म दिला.