Optical Illusion फोटोत लपलंय एक 'भूत', 15 सेकंदात शोधून दाखवा

ऑप्टिकल इल्यूजन संदर्भात असलेले फोटो किंवा व्हिडीओ दररोज आपल्या समोर येत असतात. असे फोटो आपल्याला बुद्धिमत्तेला आव्हान देतात.

Updated: Sep 20, 2022, 05:34 PM IST
Optical Illusion फोटोत लपलंय एक 'भूत', 15 सेकंदात शोधून दाखवा title=

Optical Illusion Ghost Hidden In Photo: ऑप्टिकल इल्यूजन संदर्भात असलेले फोटो किंवा व्हिडीओ दररोज आपल्या समोर येत असतात. असे फोटो आपल्याला बुद्धिमत्तेला आव्हान देतात. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोत तुम्हाला अनेक लोक दिसत असतील.  इतक्या माणसांनी भरलेल्या खोलीत भूत आहे. हे भूत शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 15 सेकंदाचा अवधी आहे. हे कोडं सोडवण्यात काही लोकच यशस्वी झाले. अनेकांनी तर यातील गुपित उलगडण्यासाठी तासंतास वेळ घालवला आहे. कोडे सोडवण्यापूर्वी, तुमच्या मोबाइल फोनमध्ये 15 सेकंदांचा टायमर सेट करायला विसरू नका. आता तुम्ही या फोटोकडे बारकाईने पाहा आणि उत्तर शोधा.

जर तुम्हाला फोटो लपलेलं भूत दिसत नसेल तर आम्ही तुम्हाला एक हिंट देतो. यामुळे तुम्हाला उत्तर शोधणं सोपं होईल. फोटोच्या उजव्या बाजूला योग्य उत्तर तुम्हाला मिळेल. आता तुमचे सर्व लक्ष फोटोच्या उजव्या बाजूला असलेल्या लोकांवर केंद्रित करा आणि तुमचा अंदाज लावा. तरीही तुम्हाला फोटोत दडलेलं भूत सापडलं नाही तर खालील फोटोमध्ये पाहा

 

फोटोत दिसणार्‍या या मुलीला भूत म्हणता येईल कारण तिचे पाय दिसत नाहीत. या ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) फोटोमुळे लोकांचे खूप मनोरंजन होत आहे.